Twelve Stabs : पत्नीने केले ओम प्रकाशांवर बारा वार

Twelve Stab

बेंगळुरू : प्रतिनिधी : कर्नाटकचे निवृत्त डीजीपी ओम प्रकाश जेवत असतानाच त्यांच्या पत्नीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर चाकूने सपासप बारा वार केले. काचेच्या बाटलीचा वापरही हल्ल्यात केला. रक्ताच्या थारोळ्यात १५ मिनिटे ओम प्रकाश पडले होते. अखेर ते मृत झाले. बेंगळुरु पोलिसांच्या तपासात हा घटनाक्रम पुढे आला आहे. (Twelve Stabs)

रविवारी (दि २०) रोजी कर्नाटकचे निवृत्त डीजीपी ओम प्रकाश यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या पत्नीने खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. कारण ओम प्रकाश यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी पल्लवीने ‘मी राक्षसाला मारले’ असे मैत्रणीला व्हिडिओ कॉलवर सांगितले होते. पोलिसांनी ओम प्रकाश यांच्या पत्नीकडे चौकशी केल्या असता खून कसा घडला याची माहिती पुढे आली आहे. (Twelve Stabs)

चेहऱ्यावर मिरचीपूड फेकली आणि चाकूचे वार

रविवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ओम प्रकाश यांनी ऑनलाईन फिश फ्राय ऑर्डर केले होते. त्यांच्या प्लेटमध्ये भातासोबत दोन मासे वाढले होते. प्रकाश यांनी एक मासा खाल्ला. भात निम्मा संपवला असतानाच त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पूड फेकली आणि स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला पल्लवीने मानेवर वार केले. त्यानंतर तेलाच्या बाटलीने त्यांच्यावर वार केले असा जबाब त्यांनी दिला आहे. (Twelve Stabs)

मृतदेहाजवळ दोन बाटल्या

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर १५ मिनिटेहून अधिक काळ ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या मृतदेहाजवळ एक टॉयलेट क्लिनर आणि दुसरी फ्लोअर क्लिनरची अशा दोन बाटल्या सापडल्या. पल्लवीने हल्ला केल्यानंतर ओम प्रकाश घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण तिने त्यांच्या चेहऱ्यावर ब्लॅकेंट टाकले आणि जमिनीवर ढकलून दिले. प्रकाशने पत्नीकडे मारु नको म्हणून विनवणी केली असता तिने त्यांच्या मान, खांदा, पोट आणि पाठीवर वार केले.

हत्येच्यावेळी मुलगी उपस्थित?  

पोलिस घटनास्थळी पोचले तेव्हा पल्लवी त्यांच्या शेजारी उभी होती. त्यांचे डोके ब्लॅकेंटमध्ये गुंडाळलेले होते. त्यांच्या अंगात लुंगी, बनियन होते. लुंगी आणि बनियन रक्ताने माखले होते असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हत्येच्यावेळी त्याची मुलगी कृती घटनास्थळीच होती असा पोलिसांना संशय आहे. पण घटनास्थळी जेव्हा पोलिस पोचले तेव्हा कृती तिसऱ्या मजल्यावरील तिच्या घरी होती (Twelve Stabs)

मी राक्षसाला ठार केले

हत्येनंतर तिच्या एका मैत्रिणीला, निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला, मी राक्षसाला ठार मारले असा   मारल्याचे मेसेज केला होता,” असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर पल्लवीने निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला आणि प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दाखवला.
पल्लवीने इतर दोघांनाही फोन करून घटनेची माहिती दिली. त्यापैकी एकाने पोलिस हेल्पलाइन ११२ ला कळवले. पण होयसळा पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी, पल्लवीने स्वतः एचएसआर लेआउट पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली.

मालमत्तेची तपासणी

या प्रकरणाची चौकशी अनेक बाजूंनी सुरू आहे.  ज्यामध्ये जोडप्यातील मालमत्तेच्या वादाचा समावेश आहे. प्रकाशच्या बहुतेक मालमत्ता उत्तरा कन्नड जिल्ह्यात आहेत. प्रकाश १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तरा कन्नडचे पोलिस अधीक्षक होते.कुटुंबातील सूत्रांनी पोलिसांना सांगितले की प्रकाशने २०११-१२ मध्ये जोईडा येथे काही एकर जमीन खरेदी केली होती. त्यांचे पाच एकर जमिनीवर फार्महाऊस आहे. पल्लवीचा आरोप आहे की प्रकाश तिला किंवा तिच्या मुलीला कोणतीही मालमत्ता देत नव्हता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. (Twelve Stab)

मुलीच्या घराचा दरवाजा जबरदस्तीने उघडला
ओम प्रकाश यांची मुलगी कृतीने हिने  तिसऱ्या मजल्यावरील घराचा दरवाजा उघडला नाही. पोलिसांना जबरदस्तीने दरवाजा उघडावा लागला. तिने पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला आणि गोंधळ करण्याचा प्रयत्न केला.  पोलिस सूत्रांनुसार, ती त्यांना सतत हात लावू नका असे सांगत होती. तिने बोटांचे ठसे देण्यासही प्रतिकार केला होता.  चौकशीनंतर, कृतीला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा :
खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत
रामदेवबाबांची दिल्ली हायकोर्टाकडून कानउघाडणी

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या