Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत

Athani murder

कोल्हापूर : प्रतिनिधी : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी खून केलेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी तब्बल सव्वाशेहून अधिक सीसीटीव्हींची तपासणी केली. एक संशयित कार मिळाली. संशयित कारचा नंबर जयसिंगपूरमधील सीसीटीव्हीत मिळाला. आणि या नंबरवरुन माग काढत पोलिस पोचले कर्नाटक हद्दीत. कर्नाटकातील अथणी गावात मयत व्यक्ती आणि खून करणारे गुन्हेगार सापडले. अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी संशयितांच्या हातात बेड्या ठोकल्या. (Athani murder)

जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह आढळला

जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या यमाई मंदिराच्या पायथ्याशी १९ एप्रिल रोजी ४० ते ५० वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. मारहाण करुन दोरीने गळा आवळून मयताचे हात बांधलेले होते. कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आणि पोलिसांनी तपास सुरू केला. (Athani murder)

तपासासाठी तीन पथके

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तीन पथके तयार केली. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे कर्नाटकमधील बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरू केली. तसेच गोपनीय पथक आणि तांत्रिक तपास सुरू झाला.

सव्वाशेहून अधिक सीसीटीव्ही तपास

पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकातील हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे आणि रुपेश माने यांच्या पथकाने जिल्ह्यातील सव्वाशे सीसीसीटीव्हीची तपासणी केली. कॅमेऱ्याची तपासणी करताना ओमणी कारमधून मृतदेह जोतिबा डोंगर परिसरात आणल्याचे दिसून आले. (Athani murder)

जयसिंगपुरात लागला कार नंबरचा ट्रेस

ओमनी कारचा शोध घेत असताना जयसिंगपूर येथील एका सीसीटीव्हीत कारचा नंबर सापडला. ओमनी कार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावातील राजू हुलगटी याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अथणीमधून राजू भिमाप्पा हुलगटी (वय ४१, रा. देसाईवाडी, अथणी) याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. (Athani murder)

अनैतिक संबंधातून खून

आप्पासो शंकर बोरगावे (वय ४५, रा. मोळे, ता. कागवाड, जि. बेळगाव) असे खून झाल्याचे व्यक्तीचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. मयत आप्पासो बोरगावे याच्या भावाचा आठ वर्षापूर्वी मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूपश्चात त्याच्या पत्नीशी आप्पासो याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. गेल्या काही वर्षात भावाच्या पत्नीचे मुख्य संशयित गौडप्पा शिंदे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्याची माहिती आप्पासो बोरगावेला कळाल्यावर तो भावाच्या पत्नीस मारहाण करुन शिविगाळ करायचा. मयताच्या भावाच्या पत्नीने गौडप्पा शिंदे याला फोन करुन आप्पा बोरगावे याला संपवण्यास सांगितले. त्यानंतर गौडप्पा शिंदेने खुनाचा कट रचला. (Athani murder)

उगारला दारु पाजवून जोतिबा परिसरात आणले

मुख्य संशयित गौडाप्पा शिंदे यांने आप्पाजी बोरगावे याला १८ एप्रिलला उगार या गावी बोलावले. तिथे अप्पाजी बोरगावे एका हॉटेलवर दारु पाजली. त्यानंतर ओमनी कारने हात पाय बांधून बोरगावेला जोतिबा डोंगराच्या यमाई मंदिराच्या पायथ्याशी आणले. बोरगावेचा गळा आवळून खून करुन मृतदेह फेकून दिला. मुख्य संशयित शिंदेने खुनाची कबुली दिल्यावर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या गुन्ह्यात शिंदे याच्यासह ओमनी कारचालक राजू हुलागटीलाही अटक केली आहे. (Athani murder)

यांनी केला तपास

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलिस अंमलदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे, रुपेश माने, राम कोळी, वसंत पिंगळे, सतीश जंगम, बालाजी पाटील, कृष्णात पिंगळे, प्रशांत कांबळे, अरविंद पाटील, अमित सर्जे, हंबीर अतिग्रे यांचा समावेश होता. (Athani murder)

हेही वाचा :  

‘मी त्या राक्षसाला ठार केले…’

कुरूंदकरने वूडकटरने केले होते अश्विनींच्या मृतदेहाचे तुकडे

पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप

Related posts

पाच कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक 

अयोध्या राममंदिरातील दानपेटीतील रक्कमेचा कोट्यवधीचा अपहार?

सह्याद्रीत साकारले ‘पक्ष्यांचे गाव’