मालमत्तेच्या वादातून हॉटेलमध्ये गोळीबार ; पाच ठार

Five killed in a shooting at a hotel in Guwahati

कोल्हापूर : मालमत्ता आणि भाडेकरारावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन गोळीबारात झाले. एकाच पिस्तूलातून संशयिताने सलग सहा गोळ्या फायर केल्या. त्यामध्ये पाच जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला. आसामची राजधानी गुवाहाटी येथील हॉटेल बिलास इन मध्ये सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे. पोलिसांनी हल्लेखोरांला घटनेनंतर एक तासात अटक केली आहे. घनकांत गोगाई असे त्याचे नाव आहे. (Five killed in a shooting at a hotel in Guwahati)

मयत झालेले पाचही जण हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापनाशी संबधित आहेत. मृतांपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत, अशी माहिती गुवाहटीचे पोलिस आयुक्त पार्थ सारथी महंत यांनी दिली. अटक केलेला संशयित घनकांत गोगई यांनी एक वर्षापूर्वी हॉटेल भाडेतत्वावर चालवण्यास घेतले होते. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हॉटेलचे मालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यासमवेत संशयित घनकांत गोगई याच्याशी वाद झाला. या वादाच्यावेळी घनकांतने ३२ बोरचे पिस्तूल बाहेर काढले आणि सहा राऊंड फायर केले. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. हेलेना भराली. देबोर्शी कश्यप, नारायण दास अशी मृतांची नावे आहेत. आणखीन दोघांची ओळख पटलेली नाही. या हल्ल्यात वाचलेले ४२ वर्षी सत्येन पाठक यांच्या खांद्याला गोळी लागली आहे. (Five killed in a shooting at a hotel in Guwahati)

या घटनेबद्दल आसाम काँग्रेसचे अध्यक्ष खासदार गौरव गोगोई यांनी दु:ख व्यक्त केले आणि गुवाहटीतील सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

ईडीच्या साडेसातीतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सुटका