Gold price  : ‘सोनि’याचा वेलू गेला ‘लाखा’वरी

Gold price

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जागतिक व्यापार युद्ध, शेअर बाजारातील तेजी मंदी, रुपयाच्या तुलनेत डॉलर बळकट झाल्याने सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ सुरू असून सोन्याचा दर दहा ग्रॅमला म्हणजेच एक तोळयाला एक लाख रुपये दर झाला आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढला आहे. सोन्याचा दर कसा ठरतो ? सोन्याच्या दरात वाढ कशी होते. कोणती प्रक्रिया जाणून घेऊया. (Gold price)

सोन्याचा दर अमेरिकन डॉलरवर ठरतो

सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रति औंस अमेरिकन डॉलरवर ठरतो.  भारतीय रुपयांचे अवमूल्यन झाल्याने आणि डॉलर महाग झाल्याने भारतात सोन्याचा दर वाढत आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत घटल्याने प्रति औंस सोन्याचा दर भारतात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उदाहरण घ्यावयाचे झाल्यास एक एप्रिल २०१४ रोजी सोन्याचा भाव १३०० डॉलर प्रती औंस इतका होता. त्यावेळी भारतात सोन्याचा दर प्रतितोळा २९ हजार रुपये इतका होता. बरोबर दहा वर्षाची एक एप्रिल २०२४ रोजी हाच भाव २२६० डॉलर प्रति औंस इतका होता. त्यामुळे भारतात सोन्याचा भाव प्रतितोळा ६९००० हजार रुपये इतका झाला आहे. आज २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ३५०० डॉलर प्रती औंस इतका आहे . त्यामुळे भारतात सोन्याचा दर ९९ हजार रुपये इतका झाला. सोन्याचा दर ९९ हजार आणि जीएससह अन्य करामुळे आज मंगळवारी सोन्याचा दर एक लाख दोन हजार १०० रुपये इतका झाला आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय बाजाजारात सोन्याचा भाव अंदाजे २७० टक्क्यांनी वाढला आहे. (Gold price)

सोन्याचे दर कोण ठरवते

जगभरातील सोन्याचा भाव लंडन सराफ बाजारात ठरवते. लंडन सराफ बाजार हा जगातील सर्वात मोठा सराफ बाजार आहे. २०१५ पूर्वी लंडन गोल्ड फिक्स ही सोन्याची नियामक संस्था होती. ही संस्था सोन्याची किंमत ठरवत होती. २० मार्च २०१५ मध्ये लंडन बुलियन मार्केट असोसिएशन ही नवीन संस्था तयार झाली. ही आयसीई प्रशासकीय बेंचमार्कद्वारे चालवली जाते. ही संस्था जगातील सर्व देशांच्या सरकारशी संबधित राष्ट्रीय स्तरावरील संघटनांच्या सहकार्याने सोन्याचा भाव काय असावा हे ठरवते. (Gold price)

सोन्याचे कॅरेट कसे कसे मोजतात

बाजारात २४ कॅरेट सोने, २२ कॅरेट, १८ कॅरेट, १४ कॅरेट आणि १० कॅरेट सोने मिळते. २४ कॅरेट सोने शुद्ध स्वरुपाचे असते त्यामध्ये मिश्र धातूंचे मिश्रन नसते. त्याचा चमकदार सोनेरी रंग असतो. ते अत्यंत मऊ असते. नियमित दागिण्यासाठी त्याचा वापर केला जाते. बाजारात २४ कॅरेट सोने बार आणि नाण्याच्या स्वरुपात मिळते. २२ कॅरेट सोन्यामध्ये मिश्र धातूचे दोन भाग मिसळले जातात. ज्यामुळे सोन्याचा पोत अधिक मजबूत होतो. यामुळे दागिने टिकाऊ आणि नियमित वापरासाठी आदर्श बनतात. १००% पैकी ९१.६७% मध्ये शुद्ध सोने असते आणि उर्वरित ८.३३% मध्ये निकेल, जस्त, चांदी आणि इतर धातूंसारख्या इतर धातूंचे मिश्रण असते. (Gold price)

आज मंगळवार २२ एप्रिलचे प्रमुख महागनगरातील सोन्याचे दर (२४ कॅरेट, १० ग्रॅम, प्लस जीएसटी आणि अन्य कर )

मुंबई  ९८,३८७ + ७९०

बेंगळुरू  ९८,३७५ + ७९०

दिल्ली  ९८,५३३ + ७९०

चेन्नई  ९८,३८१ + ७९०

कोलकाता ९८,३८५ + ७९०

पुणे ९८,८९३ + ७९०

स्थानिक सराफांचे मत

अमेरिका आणि चीन हे बलाढ्य देश आहेत. दोघांमध्ये टॅरिफवरुन चढाओढ सुरू आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये झाला आहे. जगातील सर्वच देश सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याने सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतात सोन्याचा ९९ हजारपर्यंत पोचला असून जीएसटीसह अन्य कर, वाहतूक खर्च मुळे सोन्याचा दर प्रतिग्रॅम एक लाखाच्या पुढे गेला आहे.

भरत ओसवाल, दागिन्यांचे व्यापारी, कोल्हापूर (Gold price)

हेही वाचा :

जानवे काढायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

Related posts

ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?

अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?

१५ लाख कोटींचा डोलारा, एलआयसी ला १६०० कोटींचा फटका