उत्तराखंडामधील हेलिकॉप्टर अपघात बेळगावच्या पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

Five killed in helicopter crash in Uttarakhand

बेळगाव : प्रतिनिधी :  उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील जोशीमठाजवळ  हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील २००७ च्या बॅचचे पोलीस अधिकारी  अरुण साळुंखे यांचा समावेश आहे. (Five killed in helicopter crash in Uttarakhand)

जोशीमठाजवळील चाई गावाजवळ मारवाडी पुलाजवळ दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. दुपारी सव्वाएक वाजता हेलिकॉप्टरचा रडारवरील संपर्क सुटला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरवरुन नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रान्स भारत एव्हिएन कंपनीचे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनकडे जात होते. (Five killed in helicopter crash in Uttarakhand)

अपघातात सहा जण ठार झाले असून पाच प्रवासी बेंगळुरू असल्याची माहिती पुढे आहे. पायलट कॅप्टन हिमांशू संभरवाल, पोलिस अधिकारी अरुण साळुंखे, एच.एस.नागराज, प्रताप बिचीहळळी, सुधीर के. शंकर गौडा व्ही.बी अशी मृतांची नावे आहेत. (Five killed in helicopter crash in Uttarakhand)

अरुण साळुंखे हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अरटाळ गावचे रहिवासी होते. ते २००७ च्या बॅचचे पोलीस अधिकारी होते. सुरुवातीला त्यांनी दिल्लीत इंटेलिजन्स इन्स्पेक्टर म्हणून काम केले होते. त्यानंतर बंगळुरूमध्ये नेलमंगला, कुणिगल आणि बाणसवाडी येथे त्यांनी सेवा बजावली. सध्या ते बंगलोर शहर गुन्हे शाखेत सेवा बजावत होते. सीसीबीमध्ये कार्यरत होते.ते पत्नी आणि दोन मुलांसह बंगळुरूमध्ये वास्तव्यास होते. त्यांचे वडील आणि भाऊ अरटाळ गावात राहतात.त्यांच्या मृत्यूमुळे अरटाळ गावावर शोककळा पसरली आहे. (Five killed in helicopter crash in Uttarakhand)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

ईडीच्या साडेसातीतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सुटका