Pawar’s call to Fadnavis : बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

Pawar's call to Fadnavis

मुंबई : प्रतिनिधी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेने राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आमदार पडळकरांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन ‘बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा’ अशी विनंती केली. (Pawar’s call to Fadnavis)

सांगली येथे अभियंता आत्महत्या प्रकरणावरुन काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार पडळकर सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच जयंत पाटील यांचे वडील माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्याविषयी खालच्या पातळीवरील विधान केले. या वक्तव्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात संतापाची लाट उसळली आहे. भाजपच्या नेत्यांनी पडळकर यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. (Pawar’s call to Fadnavis)

पडळकरांच्या वक्तव्याची दखल घेत शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला. बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना आवरा असे शरद पवार म्हणाले. शरद पवारांपूर्वी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपला सुनावले होते. भाजपच्या लोकप्रतिनिधींचे किंवा त्यांच्या नेत्यांचे चुकत असेल तर त्याची नोंद भाजपने घ्यायला हवी. वादग्रस्त वक्तव्यावरुन महायुतीचे धोरण ठरलेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भाजप संदर्भातील जबाबदारी असल्याचे त्यावर ते निर्णय घेतील अशी भावना व्यक्त केली. (Pawar’s call to Fadnavis)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर