कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने दक्षिण महाराष्ट्रातील पाच ऑक्टोबर रोजी ट्रायथलॉन आणि डूएथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे आयर्नमॅन चेतन चव्हाण, आकाश कोरगावकर, डॉ .विजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Ruggedian Competition)
रगेडीयन आणि केएससीच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी स्पर्धेचे सातवे वर्ष असून ५ ऑक्टोबर रोजी ट्रायथलॉन आणि डूएथलॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेला लोहपुरुष हे नाव देण्यात आले असून राजाराम तलाव येथे सकाळी सहा वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.१.९ किलोमीटर पोहणे,९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग असे स्पर्धेचे स्वरूप आहे.याला ट्रायथलॉन असे म्हटले जाते. डूएथलॉन मध्ये केवळ रनिंग आणि सायकलिंग स्पर्धा होणार आहेत. (Ruggedian Competition)
क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने या स्पर्धा कोल्हापूर मध्ये होत असून देश विदेशातील ५०० हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना, टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग आणि अल्पोपहार आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत..स्पर्धकांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून धमाल मस्ती करावयास मिळणार आहे.या स्पर्धेसाठी एकूण २५० स्वयंसेवक कार्यरत राहतील. स्पर्धेसाठी एस.आर.पाटील, डॉ.प्रदीप पाटील,आशिष तंबाके,गोरख माळी,महेश शेळके,आदित्य शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. (Ruggedian Competition)
रनिंग आणि स्विमिंग स्पर्धा ही राजाराम तलाव येथे सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे.तर यातील सायकलिंग ही स्पर्धा राजाराम तलाव येथून सुरू होणार आहे. शिवाजी विद्यापीठ,लक्ष्मी टेकडी,फाईल्व स्टार एम आय डी सी,निपाणी पुन्हा राजाराम तलाव असा स्पर्धेचा मार्ग आहे. (Ruggedian Competition)