राहूल गांधी कधीही मोदी सरकारपुढे झुकले नाही ; प्रियांका गांधीकडून भावाची पाठराखण

Priyanka Gandhi supports her brother

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील मांडण्यात आलेल्या चर्चेत खासदार प्रियांका गांधी यांनी राहूल गांधीची पाठराखण केली. गेल्या बारा वर्षात राहूल गांधी मोदी सरकारपुढे कधीच झुकले नाही, अशी घणाघाती टीका केली.

प्रियांका गांधी अविश्वास प्रस्तावावर काय बोलतात याकडे सभागृहाचे लक्ष लागले होते. त्या म्हणाल्या. राहूल गांधी सभागृहात उभे राहून सडेतोडपणे सत्य बोलतात. या सत्याचा सामना सत्ताधारी करु शकत नाहीत. ते त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला आहे. सोशल मिडियावर कोट्यवधींच्या मोहिमा राबवण्यात आल्या. पण सत्य सर्वांसमोर आल्याशिवाय राहत नाही. लोक बघत आहेत. की राहूल गांधी कधीही सत्य बोलण्यापासून मागे हटत नाहीत. त्यामुळे सत्तेत असलेल्यांना त्यांच्या भाषणाची, त्यांच्या आवाजाची भिती वाटते. (Priyanka Gandhi supports her brother)

प्रियांका गांधी म्हणाल्या, एकच व्यक्ती आहे की या देशात जे गेल्या १२ वर्षामध्ये त्यांच्यासमोर झुकलेले नाही. ते म्हणजे लोकसभा विरोधी पक्षनेते राहूल गांधी  आहे. ते या सभागृहात उभं राहून कोणालाही न घाबरता सडेतोडपणे सत्य बोलतात. जे सत्याधारांना जराही पचत नाही. (Priyanka Gandhi supports her brother)

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की, देशासमोर येणाऱ्या काळात अनेक मोठी संकटे येऊ शकतात. देशातील संपत्ती मोठ्या प्रमाणात मोजक्या काही उद्योगपतींच्या हातात देण्यात आली आहे. याबद्दल प्रश्न विचारला तर सरकारकडून उत्तर मिळत नाही. संसदेत मुख्य विषयांवर चर्चा होत नाही, वंदे मातरम्, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्याबद्दल चर्चा केली जाते. मात्र महागाई, बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय व्यापार करार या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. देशातील शेतकरी अडचणीत आहे, त्यावर चर्चा होत नाही, त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. अमेरिका – भारत व्यापार करारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. (Priyanka Gandhi supports her brother)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर