राजू शेट्टींच्या संघर्षाला यश; उसाला पहिली उचल प्रतिटन ३९०० रुपये

Raju Shetti’s 'rasta roko' protest proves successful

कोल्हापूर : प्रतिनिधी : उसाला प्रतिटन ४२०० रुपयांची उचल मिळाली या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रीय महामार्गावरील चक्का जाम आंदोलनाला यश आले आहे. तब्बल ६१ तासांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी प्रतिटन उसाला ३९०० रुपये देण्याची मागणी मान्य केली आहे. त्याशिवाय ऊस हंगाम संपल्यावर प्रतिटन १०० रुपये आणि भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर आणखी २०० रुपये देण्याची तयारी साखर कारखानदारांनी दर्शवली. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर किणी टोल नाका खुला झाल्यानंतर पुणे बेंगळुर महामार्गावरील वाहतूक खुली झाली. (Raju Shetti’s ‘rasta roko’ protest proves successful)

राजू शेट्टींची जिल्हा बंदची हाक

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये दर देण्याची मागणी केली होती. या मागणी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला पुणे बंगळुरू महामार्गावर हजारो वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिस प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवली. पहिले दोन दिवस राज्य सरकार आणि कारखानदारांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी मुंबईकडे जाणारी दूध आणि भाजी वाहतूक रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. तसेच शुक्रवारी ६ रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा केली. दरम्यान राजू शेट्टी प्रतिटन ४५०० रुपयाऐवजी प्रतिटन ४२०० रुपये दर देण्याची मागणी करत एक पाऊल मागे घेतले. (Raju Shetti’s ‘rasta roko’ protest proves successful)

मध्यरात्री निघाला यशस्वी तोडगा

आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी बोलण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी सोपवली. काल गुरुवारी रात्रीपासून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बैठका सुरू करण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक झाली. बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांची मागणी कारखानदारांना देण्यात आली. पण ही बोलणी फिसकटली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर पुन्हा दुसरी बैठक घेण्यात आली. एका हॉटेलमध्ये राजू शेट्टी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, कारखानदारांचे प्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला.

शेतकऱ्यांचा आनंदोत्सव

बैठकीच्या तोडग्याची माहिती राजू शेतकरी यांनी शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांची प्रतिटन ४२०० रुपयांची मागणी मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. त्यानंतर तब्बल ६१ तासानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. (Raju Shetti’s ‘rasta roko’ protest proves successful)

Related posts

गोकुळ अध्यक्ष निवड अध्यादेश विरोधातील मोर्चात लाखोंच्या सहभागाचा निर्धार

दिवाळीतही हजारो शेतकरी  ५ हजाराच्या मदतीपासून वंचित: मंत्री मकरंद पाटील यांची कबुली

अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा : सुनील तटकरे