प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; निवडणूक लढण्याचे दिले संकेत

Prashant Jagtap joins the Congress party

पुणे : प्रतिनिधी : पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी त्यांचे स्वागत केले. कालच जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली असून त्यांना काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते.

जगतापांचा प्रवेश काँग्रेसला बळ देणारा

प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण त्यांनी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि आमदार विजय वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी  एकत्र येत असल्याने  जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांना दोन्ही शिवसेनेसह पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. वैचारिक भूमिकेतून त्यांनी घेतलेला हा निर्णय  काँग्रेसला बळ देणारा असल्याचे सांगून  प्रदेशाध्यक्ष  सपकाळ यांनी यावेळी सांगितले.आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’, या टॅगलाईनचे व टिझरचे प्रकाशन करण्यात आले. (Prashant Jagtap joins the Congress party)

भाजपला काँग्रेस पक्षच टक्कर देईल

प्रशांत जगताप  म्हणाले की, काँग्रेस पक्ष आहे १३५ वर्षांचा जुना पक्ष असून अथांग महासागर आहे कितीही वादळे आली तरी तो हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे. पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता असून शिव शाहू फुले आंबेडकर, गांधी व नेहरु विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माझी लढाई जातीवादी व भ्रष्टाचाराविरोधात आहे. आणि आज भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो. (Prashant Jagtap joins the Congress party)

नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ४१ नगराध्यक्ष विजयी झाले. त्यांचा आज टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत  सत्कार करण्यात आला. नगरपालिका निवडणुकीत १००६ नगरसेवक निवडून आले तर १०० नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी पैशांचा वारेमाप वापर केला, पोलीसांचा वापर केला. निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला होता. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आली, मारहाण करण्यात आली, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता न डगमगता लढला व यश मिळवले,  असे  प्रदेशाध्यक्ष  सपकाळ यांनी सांगितले. (Prashant Jagtap joins the Congress party)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर