टाकाळा सायंटिफिक लँडफिल साईटला उच्च न्यायालयाची मान्यता

Takala landfill site receives approval from the High Court

कोल्हापूर  : प्रतिनिधी : टाकाळा-राजारामपुरी येथील सायंटिफिर लँडफिलला (इनर्ट मटेरियल) उच्च न्यायालयाने मान्यता मिळाली आहे. २०१३ पासून या साईटला मान्यता मिळावी यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पाविरोधात कोल्हापूर शहरातील नागरिक मदन आनंदराव पुरेकर यांनी सन २०१३ मध्ये माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधीत प्रकल्पाच्या ठिकाणाची आवश्यक त्या त्रुटींची पुर्तता करुन टाकाळा लँडफील इनर्ट मटेरियल साईट कार्यान्वित करण्याबाबत पुढील काही दिवसात कारवाई सुरु करणार आहे.

जानेवारी २०१३ मध्ये शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून टाकाळा–राजारामपुरी येथे सायंटिफिक लँडफिल (इनर्ट मटेरियल) साईट विकसित करण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेने घेतला होता. त्यानुसार जानेवारी २०१३ मध्ये सदर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली होती. सदर प्रकल्पासाठी सुरुवातीला एकूण रुपये ६१४.०० लक्ष इतका खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. आजअखेर या प्रकल्पावर रुपये ५२४.०० लक्ष इतका खर्च झालेला असून प्रकल्पांतर्गत  रिटेनिंग वॉल, खरमाती व मुरूम वापरून फॉर्मेशन लेव्हल, ९० सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर, एचडीपी शीट, एचडीपी सच्छिद्र पाईप व फिल्टर मीडिया अंडरग्राऊंड पाईपलाईन उभारणी केली आहे. (Takala landfill site receives approval from the High Court)

या प्रकल्पाविरोधात कोल्हापूर शहरातील नागरिक मदन पुरेकर यांनी २०१३ मध्ये  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या कालावधीत शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची सद्यस्थिती, कचरा संकलनासाठी कंटेनर पद्धत, सिव्हेज व ड्रेनेज वॉटर प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव तसेच कसबा बावडा येथील झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावर केवळ कचरा साठवला जात असल्याची परिस्थिती याचिकेत नमूद करण्यात आली होती.

दरम्यान, आज कोल्हापूर शहराची लोकसंख्या अंदाजे आठ लाख असून फ्लोटिंग लोकसंख्या सुमार एक  लाख आहे. एकूण सुमारे नऊ लाख लोकसंख्येच्या दैनंदिन घनकचरा निर्मितीच्या अनुषंगाने महानगरपालिकेने सर्व प्रकारचे आधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. सध्या शहरात प्रतिदिन सरासरी २८० ते ३०० टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी प्रतिदिन २६० ते २७० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच शहरात सुमारे २८० किलोमीटर लांबीचे अंतर्गत ड्रेनेज नेटवर्क कार्यरत असून प्रतिदिन सुमारे ३०० एमएलडी सिव्हेज वॉटरवर प्रक्रिया केली जाते. (Takala landfill site receives approval from the High Court)

महानगरपालिकेच्या बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प, स्लरी प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, आरडीएफ प्रकल्प आदींच्या माध्यमातून शहरातील घातक घनकचरा व बायोमेडिकल वेस्टवर शंभर टक्के प्रक्रिया करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.  या सर्व प्रक्रियांनंतर उरलेली खरमाती, दगड, विटा, वाळू व न कुजणारे घटक हे ‘इनर्ट मटेरियल’ म्हणून गणले जातात. हे इनर्ट मटेरियल शास्त्रोक्त पद्धतीने लँडफिल साईटवर पसरवून संबंधित भूखंडाची लेव्हल पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी बागबगीचा विकसित करण्यात येणार आहे. टाकाळा–राजारामपुरी येथील लँडफिल साईटचे मूळ आरक्षणही बगीचा असेच असून भविष्यात तेथे उद्यान विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Takala landfill site receives approval from the High Court)

महानगरपालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात महानगरपालिकेच्यावतीने विधीज्ञ सागर माने यांनी न्यायालयासमोर निवेदन केले की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व विहित कार्यपद्धती व निर्देशांनुसार टाकाळा–राजारामपुरी येथील इनर्ट मटेरियल साईट विकसित केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. न्यायालयाने शहरातील सध्याची घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी उपलब्ध जागा, प्रत्यक्ष कार्यरत असलेले प्रकल्प तसेच भविष्यात अंतिम प्रक्रिया न होणाऱ्या इनर्ट मटेरियलसाठी अन्यत्र जागा उपलब्ध नसल्याचा मुद्दा विचारात घेऊन टाकाळा–राजारामपुरी येथील बहुतांशी पूर्ण झालेल्या इनर्ट मटेरियल साईटला मान्यता दिली आहे. (Takala landfill site receives approval from the High Court)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर