नागपूर: प्रतिनिधी : राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतील मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश दिला आहे. या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या २२२ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांना २१ तारखेपर्यंत निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहिल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Municipal results on December 21)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्यास सुप्रिम कोर्टाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या तर काही ठिकाणी कायदेशीर पेच निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने २४ नगरपालिका आणि १५० पेक्षा अधिक प्रभागातील निवडणूक स्थगित केली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधकांनी तीव्र नाराजी दाखवत टीकाही केली होती. (Municipal results on December 21)
राज्यातील स्थगित केलेल्या २४ नगरपालिका आणि १५० पेक्षा जास्त प्रभागातील निवडणूक २० डिसेंबरला होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तर आज २२२ नगरपालिकांची निवडणूक आज होती. या निवडणुकीचा निकाल उद्या तीन डिसेंबरला होणार होती. पण उद्या होणाऱ्या निकालाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली असून राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा आदेश दिला आहे.
फलटण नगरपालिकेची निवडणूक स्थगित केल्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. तीन डिसेंबर राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकालाचा परिणाम २० डिसेंबरच्या निवडणुकीवर होण्याची भिती व्यक्त केली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत अनेक टप्प्यात झाल्यावर मतमोजणी एकाच दिवशी होते. त्याच प्रमाणे सर्व नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरला करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान काही उमेदवारांनी नागपूर खंडपीठात धाव घेत या निर्णयावर याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज २२२ नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया सुरू असताना तीन डिसेंबरची मतमोजणीला स्थगिती मिळाल्याची बातमी बाहेर पडली आहे. (Municipal results on December 21)