मुंबई : प्रतिनिधी : प्रचारसभातील आरोप- प्रत्यारोपामुळे गाजलेल्या राज्यातील २२२ नगरपरिषदा आणि १८नगरपंचायतींच्या मंगळवारी मतदान होत आहे. दरम्यान, न्यायालयाच्या स्थगितीमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आलेल्या २४ अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४सदस्यपदाच्या जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबरला राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उर्वरित ठिकाणी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. (Elections to 24 municipalities on December 20)
दरम्यान, ज्या ठिकाणच्या अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल. (Elections to 24 municipalities on December 20)
अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता १० डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ११ डिसेंबरला होईल. २० डिसेंबरला सकाळी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.
अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे- अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा. पुणे- बारामती व फुरसुंगी- उरुळी देवाची. सोलापूर- अनगर व मंगळवेढा. सातारा- महाबळेश्वर व फलटण. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री. नांदेड- मुखेड व धर्माबाद. लातूर- निलंगा व रेणापूर. हिंगोली- बसमत. अमरावती- अनंजनगाव सूर्जी. अकोला- बाळापूर. यवतमाळ- यवतमाळ. वाशीम- वाशीम. बुलढाणा- देऊळगावराजा. वर्धा- देवळी. चंद्रपूर- घुग्घूस.
सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांचा तपशील असा: अमरावती: अचलपूर-2, दर्यापूर-1, धारणी-2 व वरूड-1. अहिल्यानगर: जामखेड-2, राहुरी-1, शिर्डी-1, शेवगाव-3, श्रीगोंदा-1, श्रीरामपूर-1 व संगमनेर-3. कोल्हापूर: गडहिंग्लज-1. गडचिरोली: आरमोरी-1 व गडचिरोली-3. गोंदिया: गोंदिया-3 व तिरोडा-1. चंद्रपूर: गडचांदूर-1, बल्लारपूर-1, मूल-1 व वरोरा-1. छत्रपती संभाजीनगर: गंगापूर-2, पैठण-4 व वैजापूर-2. जळगाव: अंमळनेर-1, पाचोरा-2, भुसावळ-3, यावल-1, वरणगाव-2 व सावदा-3. जालना: भोकरदन-2. ठाणे: बदलापूर-6. धाराशिव: उमरगा-3 व धाराशिव-3. नांदेड: कुंडलवाडी-1, भोकर-1 व लोहा-1. नागपूर: कामठी-3, कोंढाळी-2, नरखेड-3 व रामटेक-1. नाशिक: ओझर-2, चांदवड-1 व सिन्नर-4. परभणी: जिंतूर-1 व पुर्णा-2. पालघर: पालघर-1 व वाडा-1. पुणे: तळेगाव-6, दौंड-1, लोणावळा-2 व सासवड-1. बीड: अंबेजोगाई-4, किल्ले धारूर-1 व परळी-5. बुलढाणा: खामगाव-4, जळगाव जामोद-3 व शेगाव-2. भंडारा: भंडारा-2. यवतमाळ: दिग्रस-3, पांढरकवडा-2 व वणी-1. रत्नागिरी: रत्नागिरी-2. लातूर: उद्गीर-3. वर्धा: पुलगाव-2, वर्धा-2 व हिंगणघाट-3. वाशीम: रिसोड-2. सांगली: शिराळा-1. सातारा: कराड-1 व मलकापूर-2. सोलापूर: पंढरपूर-2, बार्शी-1, मैंदर्गी-1, मोहोळ-2 व सांगोला-2 आणि हिंगोली: हिंगोली-2. (Elections to 24 municipalities on December 20)