राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण ?

Merger of NCP into Congress

जमीर काझी : मुंबई : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा संपल्यानंतर आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच पवारांनाही महाराष्ट्रात देण्यात आल्या असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत पवार यांनी विलीनीकरणाबाबत प्रस्ताव दिला होता. मात्र, काही कारणांमुळं त्यावर निर्णय घेण्यास विलंब झाल्याचा दावा केला आहे. तर पवार गटाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा इन्कार केला असून सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. (Merger of NCP into Congress)

  पाच दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस आणि पक्षापासून वेगळं होऊन स्थापन केलेल्या प्रादेशिक पक्षांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर चर्चा झाली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत दारुण अपयशानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. अनेक खासदार आणि आमदारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, तर अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असून तृणमूल काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा सुरु आहे. त्याचप्रमाणे संभाव्य फुटीची शक्यता व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भविष्यातील राजकीय अनिश्चितता टाळण्यासाठी काँग्रेसशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे.गुरुवारी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. तर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन साजरा झाला. या दोन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Merger of NCP into Congress)

नाना पटोले यांना दिल्लीतून पाचारण

काँग्रेस श्रेष्ठींनी शुक्रवारी सकाळी तातडीने नाना पटोले यांना दिल्लीला बोलावून घेतले. महाराष्ट्रातील घडामोडी व शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चेला त्यामुळे आणखी ऊत आला. पटोले यांनी विलीनीकरणाबाबतच्या पूर्वीच्या प्रस्तावाचा दाखला देत सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच भाजपाची मुकाबला करू शकतो.त्यामुळे काँग्रेसला त साथ देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

तर ठाकरे गटाचे नेते खा संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेसमधून वेगळे झालेले पक्ष आणि नेत्यांनी देशातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. देशात काँग्रेस हा एक मजबूत, अखंड आणि सक्षम पर्याय म्हणून उभा राहने आवश्यक आहे. या प्रक्रियेत शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा,” (Merger of NCP into Congress)

शशिकांत शिंदे यांचा इन्कार

 काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचे पवार गटाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले . तर खा.सुप्रिया सुळें यांनी राऊत यांच्या सूचनेचा आम्ही विचार करू. पक्षाचे सर्व आणि अंतिम निर्णय शरद पवार घेतील,” असे सांगत सावध भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीची सत्तावीस वर्षाची वाटचाल 

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १० जून १९९९ मध्ये केली. तरीही दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका समान असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून सातत्यानं करण्यात आला. १९९९ पासून केवळ २०१४ चा अपवाद वगळता दोन्ही पक्षांनी बहुतेक निवडणुका एकत्र लढवल्या आणि सत्तेतही भागीदारी कायम ठेवली. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. गेल्या जानेवारीपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं साठी अजित पवार यांनी प्रयत्न केले होते .मात्र दुर्दैवाने २८ जानेवारीला त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याबाबतची चर्चा बारगळली. आता बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे.

काँग्रेस हे बुडते जहाज : फडणवीस

 काँग्रेसला कोणतेही वक्तव्य नसून ती बुडते जहाज आहे त्यामुळे त्यामध्ये कोणीही शहाणा नेता जाणार नाही, अशी वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.

मोदींच्या कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी काँग्रेसमध्ये तृणमूल व शरद पवार यांचा पक्ष विलीनीकरण होत असल्याचे चर्चेबाबत विचारणा केले असता ते म्हणाले की,’काँग्रेस ही बुडते जहाज आहे . त्यांना कसलेही भवितव्य नाही. त्यामुळे कोणतेही लहान पक्ष असो किंवा समविचारी पक्ष शहाणे नेते त्यामध्ये जाणार नाहीत मात्र राजकारणात काहीही होऊ शकते मात्र असे विलीनीकरण झाल्यास त्याचा आम्हाला फायदा होईल ,असा दावाही फडणवीस यांनी केला. (Merger of NCP into Congress)

Related posts

मन मे है विश्वास’… आणि त्या विश्वासाला भेटले ‘विकास’!

पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक