मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिकामध्ये लेख लिहिला असून त्यावर खळबळ उडाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार होते, अजितदादा चूक दुरुस्त करणार होते, असे लेखात उल्लेख आहे. शिंदे यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. अजितदादा चूक दुरुस्त करणर होते या शिंदे यांच्या विधानावर तटकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
पक्ष मजबुतीने उभा करणे, हीच दादांना श्रद्धाजंली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिकामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लेख लिहिला आहे. लेखात शिंदे यांनी विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करुन प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धाजंली ठरेल. (Tatkare’s response to Shinde’s merger article)
शिंदेंचा हेतू कळला नाही
शशिकांत शिंदे यांच्या लेखातील काही वाक्यावर सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतले आहेत. ते म्हणाले, शशिकांत शिंदे यांच्या लेखावर माझा आक्षेप आहे. यामागे शिंदेचा हेतू कळू शकला नाही. अजित पवारांच्या निधनानंतर अशी विधाने करणे दुर्देवी आहे, अशी खंत व्यक्त केली. अजितदादा चूक दुरुस्त करणार होते या विधानावर आक्षेप असल्याचे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यावर चर्चा करु
सुनील तटकरे म्हणाले, “आम्ही एनडीएचा एक भाग आहोत. त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा होत असेल तर आम्हाला भाजपशी याबाबत चर्चा करावी लागेल. कारण, आम्ही भाजपच्या संमतीने एनडीएमध्ये सहभाग झालो होतो. जर विलीनीकरणाचा प्रस्ताव आल्यास चर्चा करू,” शशिकांत शिंदे यांनी एका लेखात अनेक मोठे दावे केले आहेत. यावर ते म्हणाले की, “शशिकांत शिंदे यांनी जे काही लेखात लिहिले आहे ते अनाठायी आहे. यातून शशिकांत शिंदेंना नेमकं काय साध्य करायचे आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. (Tatkare’s response to Shinde’s merger article)
विधाने करताना भान राखणे महत्वाचे
शशिकांत शिंदे त्यांच्या लेखात म्हणतात की, विलीनीकरणासंदर्भात बैठका झाल्या होत्या. अजितदादा काही नेत्यांना कंटाळले असल्याचे ते म्हणाले आहेत. मग हा इशारा कोणाकडे होता? असे विचारताच सुनील तटकरे म्हणाले की, “शशिकांत शिंदे साताऱ्याचे आहेत, त्यामुळे हा इशारा कोणाकडे होता? हे त्यांनाच माहिती. त्यांच्या बैठकीमध्ये अजितदादा बोलले असतील तर ते मला कसे माहिती असणार? मला याबद्दल काही कल्पना नाही. अजितदादा यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर अशा प्रकारची विधाने करणे, चांगले नाही. कुठल्या विषयावरती काय बोलावे? कसे बोलावे? याचे भान प्रत्येकाने राखणे महत्त्वाचे आहे,”. (Tatkare’s response to Shinde’s merger article)