त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचार, स्वहिताचा; फडणवीसांचा हल्लाबोल

Fadnavis criticizes the Thackeray brothers

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगरपालिकेसाठी युती झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांनी युतीवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे अशी टीका केली. स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Fadnavis criticizes the Thackeray brothers)

फडणवीस म्हणाले, पक्षाला निवडणुकीतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही पक्षांनी युती  केली आहे. यामुळे फार काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. या मंडळींनी  मुंबईकरांचा सातत्याने विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे काम यांनी केले. मराठी माणूस यांच्यासोबत नाही. अमराठी माणसांवर हल्ले केल्याने तेही यांच्यासोबत नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. त्यांनी अजून दोन चार लोक सोबत घेतले तरी मुंबईकर हे महायुतीचे काम पाहून, भविष्यातील काम बघून महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. (Fadnavis criticizes the Thackeray brothers)

अख्ख्या दुनियेला माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी ठाकरे बंधूंना मारला.  फक्त मतांसाठी रोज मत बदलणारे आम्ही लोक नाहीत. आम्ही हिंदुत्वादी काल ही होतो आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचे हिंदुत्व जनतेला मान्य आहे. मत मिळवण्याकरता त्यांनी आपले मत बदलले. नेहमीप्रमाणे पलटी मारली आहे. पण शेवटी जुनी पापं आहेत आणि ती लोकांनी बघितली आहेत, असा हल्लाबोल यावेळी फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर केला आहे. (Fadnavis criticizes the Thackeray brothers)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर