मुंबईत काँग्रेसची ‘वंचित’ बरोबर आघाडी?

Congress forms an alliance with 'Vanchit'

मुंबई  : प्रतिनिधी :  मुंबई महानगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची बोलणी सुरू  केली आहे. मुंबई काँग्रेसकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, सचिन सावंत व माजी मंत्री आमदार अस्लम शेख यांनी  रविवारी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. (Congress forms an alliance with ‘Vanchit)

 आघाडीच्या नियोजनासाठी दोन्ही पक्ष लवकरच चर्चा करणार आहेत अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.

मुंबई काँग्रेसने वंचितसोबत आघाडीसाठी आमदार अमीन पटेल, माजी आमदार मधु चव्हाण, व  मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांची समिती बनवलेली आहे. आजची चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच पुन्हा चर्चा केली जाईल, असेही  राजहंस यांनी सांगितले आहे. (Congress forms an alliance with ‘Vanchit)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार