साताऱ्यातील यश भाजपचे नव्हे, दोन्ही राजाचं : सुप्रिया सुळे

Both victories in Satara belong to the two Raje

मुंबई : नगरपालिका, नगरपंचायतीतील यश हे भाजपाच्या मुळ ताकदीचे नसून आयात केलेल्या नेत्यांचे आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सातारा नगरपालिकेत मिळालेले यश भाजपचे नसून दोन्ही राजांचं आहे असे भाष्यही त्यांनी केले. मुंबईत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होत्या. (Both victories in Satara belong to the two Raje)

 निवडणुकीतील पराभवानंतर आत्मचिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या निकालानंतर आत्मचिंतन करायलाच हवे.. तसेच जे निवडून आलेत त्यांना शुभेच्छा आहेत. पण तुम्ही डेटा पाहिला तर जो जो सत्तेत असतो त्यांचाच नगरपालिकेसारख्या स्थानिक निवडणुकांमध्ये विजय होतो आणि ही काही नवीन गोष्ट नाही. कारण ज्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली, मतांचे विभाजन करण्यात आलं त्यानुसार मला निकाल पाहून काही आश्वर्य वाटलं नाही, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजपाच्या १२४ नगराध्यक्षांपैकी कितीतरी बाहेरचे उमेदवार निवडून आले आहेत? असा सवालही त्यांनी केला. (Both victories in Satara belong to the two Raje)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर