नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची अटक टळलीच आहे शिवाय त्यांची आमदारकीही शाबूत राहिली आहे. (Kokate’s arrest averted)
सर्वोच्च न्यायालयात मंत्री कोकाटे यांनी अर्ज केला होता. तो अर्ज सुनावणीसाठी व्हेकेशन बेंचसमोर आज सोमवारी आला. त्यांच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या आमदारकीच्या अपात्रतेलाही स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावल्याने आमदारकी जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता त्यांची आमदारकी वाचली आहे. (Kokate’s arrest averted)
नाशिकमधील सरकारी कोट्यातील सदनिकेच्या घोटाळा प्रकरणात कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सदनिकेच्या घोटाळा प्रकरणी कोकाटेंना प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली होती. प्रथम वर्ग न्यायालयाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली होती. शिवाय त्यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कोकाटे तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते आणि त्यांच्या वतीने बुधवारीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेच्या स्थगितीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर १९ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यायात न्यायालयाने कोकाटेंना दिलासा देत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यामुळे तुर्तास कोकाटेंची अटक टळली होती. (Kokate’s arrest averted)