Bulana Lakhu : ‘ईव्हीएम’वरील विजय सर्वोच्च न्यायालयाने फिरवला

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील ईव्हीएम मशिनवर झालेल्या मतमोजणीतील घोळानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत निकाल फिरवला. ईव्हीएमवरील विजयी उमेदवाराची मते पराभूत उमेदवारांच्या खात्यात टाकल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी पराभूत उमेदवाराला विजयी उमेदवार म्हणून घोषीत केले. पराभूत उमेदवारांने न्यायालयीन लढाई करत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईव्हीएम मतमोजणी केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी घातलेला घोळ लक्षात आल्यावर पराभूत उमेदवाराला विजयी घोषीत केले. न्यायालयीन लढाई केलेल्या उमेदवारांने सरपंच पदाची शपथ घेतली. (Bulana Lakhu)

सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस सूर्यकांत, जस्टिस दिपांकर दत्ता, जस्टिस नोंग्मीकापम कोटिश्वर सिंह यांच्या पीठाने ११ ऑगस्टला हा निर्णय दिला. हरियाणामधील पानिपत जिल्ह्यातील बूलाना लाखू ग्राम पंचायतीसाठी २०२३ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उलटला आहे. याचिकाकर्ता मोहित मलिक यांना नवनिर्वाचित सरपंच घोषित केले आहे. या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या देखरेखीत फेर मतमोजणी केली. यामध्ये मोहित मलिक ५१ मतांनी विजयी झाले. या मतमोजणीसाठी न्यायालयाने रिजस्ट्रारची नियुक्ती केली आणि संपूर्ण मतमोजणीची व्हिडिओ शुटिंग करण्यात आले. (Bulana Lakhu)

पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्रामपंचायतीसाठी दोन नोव्हेंबर २०२३ मध्ये निवडणूक झाली होती. सरपंच पदाच्या या निवडणुकीत मोहित मलिक आणि कुलदीप यांच्यासह इतरही उमेदवार होते. मोहित आणि कुलदीप यांच्यात खरी लढत झाली. मतमोजणीनंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी ५१ मतांनी कुलदीप यांना विजयी घोषित केले आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले होते. यावेळी मोहित समर्थकांनी जोरदार गोंधळ केला. ज्या वॉर्डमध्ये मोहित मलिक यांच्या प्राबल्य होते, त्याच वॉर्डमध्ये कुलदीप सिंह यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना निकालावर शंका आली. त्यांनी या मतमोजणीला विरोध दर्शवला आणि फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर पुन्हा मतमोजणी करण्यात आली, त्यामध्ये मोहित मलिक हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. मात्र त्याआधीच सरपंच पदाचे नियुक्तीपत्र कुलदीप यांना देण्यात आले होते. (Bulana Lakhu)

बुआना लाखू गावात सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत ३७६७ मतदान झाले. यातील कुलदीप सिंह यांना १००० मते मिळाली तर मोहित मलिक यांना १०५१मते मिळाली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी नजरचुकीने मोहित यांची ५१ मते ही कुलदीप यांच्या खात्यात जमा केली. मतांच्या या अदलाबदलीमुळे कुलदीप यांना विजयी घोषित करण्यात आले. मोहित मलिक यांनी या निर्णयाला आव्हान दिले. जिल्हा पातळीवर पुन्हा मतमोजणी करण्यात आली तिथे मोहित यांची ५१ मते कुलदीप यांच्या खात्यात गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र सरपंच नियुक्ती पत्र कुलदीप यांना मिळाल्यामुळे त्यांनी पद सोडण्यास नकार दिला. यानंतर प्रकरण हायकोर्टात गेले. तिथे मात्र कुलदीप यांना स्टे मिळाला. त्यामुळे ते सरपंचपदी कायम राहिले. हायकोर्टाचा निर्णयानुसार २०२४पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कुलदीप यांना सरपंच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय दिला.

मोहित मलिक यांनी हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात कुलदीप यांची याचिका रद्द ठरवण्यात आली आणि जिल्हा न्यायालयाला फेरमतमोजणीचे आदेश दिले. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या देखरेखीत सहा ऑगस्ट रोजी ईव्हीएम मतांची मतमोजणी झाली. यामध्ये ५१ मते मोहित यांना जास्त असल्याचे समोर आले.त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी मोहित मलिक यांना सरपंच घोषित केले. (Bulana Lakhu)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर