जमीर काझी : मुंबई : टिपू सुलतान यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्याच्या निषेधार्थ मुंबई,पुणेसह ठिकठिकाणी मोर्चा, जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर काँग्रेसकडूही त्याला प्रत्युत्तर देण्यात येत असून टिपू सुलताना बाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी वेळोवेळी केलेली गौरवोद्गार आणि त्याचे स्मारक, चौकाला नामकरण करण्यासाठी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केलेल्या ठरावाचे पुरावे सादर करून दुतोंडीपणा उघड केला.
पुण्यातील काँग्रेस भवन येथे भाजपा च्या आंदोलनावर कार्यालयावर दगडफेक करण्यात आली त्यामध्ये काहीजण जखमी झाले तर गाड्यांचे ही नुकसान झाले. पुणे महापौर आणि पुणे भाजपा शहराध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (BJP, Congress fight over Tipu Sultan issues)
टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापेक्षा जास्त लांगूलचालन या जन्मात मी बघितलेलं नाही, असे म्हणत सपकाळ यांच्याकडून माफीची मागणी केली होती. आक्रमक झालेल्या भाजपाने त्याविरुद्ध राज्यभरात आंदोलन सुरु करून सपकाळ यांचा निषेध करत आहेत.पुणे काँग्रेस भवनबाहेर भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवन येथे आमने-सामने आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाकडून कार्यालयावर दगडफेक केली. त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले. काही गाड्यांचेदेखील नुकसान झाले आहे. दगडफेकीविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते हे पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशन येथे जमा झाले. पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपाच्यायांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (BJP, Congress fight over Tipu Sultan issues)
काँग्रेसकडून भाजपाचा तीव्र निषेध…. पुण्यातील काँग्रेस आणि भाजपामधील भवन येथे दगडफेक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मुंबई, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा याठिकाणीही आंदोलन करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण होते. दरम्यान, टिपू सुलतान ना पाकिस्तान हा महानायक समजतो, आणि त्याच्याबरोबर क्रिकेट सामना होत आहे, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका ठाकरे गटाचे खा संजय राऊत यांनी केली. (BJP, Congress fight over Tipu Sultan issues)
फडणवीसांना दंगली घडवायच्या आहेत…. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ” ध” चा “मा” करून देवेंद्र फडणविसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दंगलीचा प्रत्यय पुण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक केली. त्यामध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपाच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही ते म्हणाले.
असदुद्दीन ओवैसीची फडणवीसावर टीका… एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील टिपू सुलतान यांच्यावर टीका करणाऱ्यांना हैदराबादमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले, ” इंग्रजांशी लढताना टिपूल सुलतान हुतात्मा झाले. टिपूंनी वीर सावरकरांप्रमाणे इंग्रजांना प्रेमपत्रे लिहिली नाहीत. सावरकर क्षमा मागत होते. ते (इंग्रज) जे काही म्हणतील ते करण्याचे आश्वासन देत होते. टिपू सुलतान यांनी तलवार हातात घेऊन इंग्रजांपासून देशाला मुक्त करण्यासाठी लढाईत हुतात्मा झाले होते. फडणवीस साहेब, टिपू सुलतान यांच्या बोटामध्ये राम अक्षर लिहिलेली अंगठी होती, हे सत्य नाही का”, असा प्रश्नही त्यांनी केला. (BJP, Congress fight over Tipu Sultan issues)