जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला. (Sapkal’s reply to Fadnavis on ‘Tipu Sultan’ questions)
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. त्यावरून उदभविलेल्या वादाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली होती. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा महाराजांचा अपमान असून याबद्दल सपकाळ यांनी माफी मागायला हवी, अशी टीका केली होती. त्याला सपकाळ यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की,’ देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये.शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही, असा टोला लगावला आहे. तसेच संविधानाच्या मूळ प्रतीवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (Sapkal’s reply to Fadnavis on ‘Tipu Sultan’ questions)