राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल मध्ये पत्रकारांचा सत्कार

Journalists felicitated at Shahu High School

कोल्हापूर : प्रतिनिधी : जुना बुधवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक, विद्या समितीचे अध्यक्ष व कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे प्रमुख अतिथी होते.

श्रीराम साळुंखे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा अहवाल मांडला. देश विदेशासह राज्य, जिल्हा, ग्रामीण आणि स्थानिक पातळीवर घटना पत्रकार समाजापुढे मांडत असतात. कोरोना काळात सर्वजण घरी असताना पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर जीव धोक्यात घालतून पत्रकार काम करत होते. समाजप्रती काम करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी शाळेतर्फे सत्कार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. (Journalists felicitated at Shahu High School)

सत्काराला उत्तर देताना पत्रकार सतीश घाटगे यांनी स्वामी विवेकानंदच्या जीवनातील शिक्षण आणि खेळाचे महत्व सांगितले. शरीर सदृढ असेल तर मन सदृढ राहते अशी विवेकानंदाची धारणा होती. अभ्यासाबरोबर मुलांनी खेळाकडेही लक्ष द्यावे असे पत्रकार घाटगे यांनी सांगितले.  (Journalists felicitated at Shahu High School)

पत्रकार श्री बावसेकर यांनी मुलांना मोबाईल पासून दूर राहा असे सांगितले. पत्रकार अनिल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र नियमित वाचावे असे सांगितले . पत्रकार यशवंत लांडगे यांनी विविध उपक्रमासाठी शाळेचे कौतुक केले. या यावेळी पत्रकार आप्पासाहेब माळी, पत्रकार कृष्णात पुरेकर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रशालेचे मुख्याध्यापक बी. जे.सावंत सर यांनी आभार मानले.  सूत्रसंचालन ए .के. कांबळे सर यांनी केले. (Journalists felicitated at Shahu High School)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर