मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चा दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटली आहे, हे दिल्लीपर्यंत कळाले पाहिजे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. शनिवारी एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे लोकलने जाणार आहेत. गड किल्ल्यांवरील नमो पर्यटन सेंटर फोडणार असल्याचा इशारा दिला. (Appeal of Raj Thackeray)
रंगशारदा सभागृहात राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्सद्वारे कशी मतचोरी होते, याचा डेमो दाखवण्यात आला.
महाराष्ट्राचा राग मोर्चातून दाखवून द्या
मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी एक तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे., दिल्लीत कळलं पाहिजे महाराष्ट्रात काय आग पेटली आहे. महाराष्ट्रात काय प्रकारचा राग आहे, ते या मोर्चातून दाखवून द्या. महाराष्ट्रातील प्रामाणिक मतदाराचा अपमान केला जात आहे. तो उन्हातान्हात उभं राहून मतदान करत आहे. मात्र त्याने केलेल्या मतदानाचा निकाल पारदर्शकच असला पाहिजे. ईव्हीएम मशिन जगातील कोणत्याच प्रगत आणि पुढारलेल्या देशात नाही. पुढारलेल्या देशात बॅलेट पेपरवर वापरला जातो. हे मी नाही सांगत तर नरेंद्र मोदी देखील सांगात होते. त्यांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. असे बरेच व्हिडिओ आहेत. असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. (Appeal of Raj Thackeray)
मतदार याद्या स्वच्छ करा
महानगरपालिकेच्या निवडणूका चार वर्षे झालेल्या नाहीत. घोळ असलेल्या मतदार याद्या स्वच्छ करा. मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी एक वर्षे लागले तरी एक वर्षाने निवडणूका घेतल्याने काय फरक पडतो असा प्रश्नही त्यांनी केला. मतदार याद्या पारदर्शक झाल्यावर निवडणूका घ्या, आज जे सत्तेत आहेत ते परत आले ती आम्हाला फरक पडणार नाही. पण मतदार याद्या पारदर्शक झाल्याच पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले. (Appeal of Raj Thackeray)
नमो केंद्र फोडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकार शिवनेरी, रायगड, राजगडावर पर्यटन केंद्र काढणार आहे. या पर्यटन केंद्रांना राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला. महाराष्ट्रातील गड किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. पर्यटन केंद्र उभे केले तर तात्काळ फोडून टाकणार असा इशाराही त्यांनी दिला.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सत्तेसाठी किती चाटूगिरी करणार अशी टीका केली. मला मुख्यमंत्री मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. यासाठी काहीही करणार. महाराजांच्या गड किल्लांवर नमो केंद्र सुरू करणार. मुंबई देखील त्यांनाच पाहिजे. सर्व जागा अदानीला देऊन टाकल्या आहेत. मुंबईत अदानी बोट ठेवेल तिकडे हे जाग देत आहेत. हे सगळे सत्तेतून येते. ही सत्ता ईव्हीएममधून येते असा टोलाही मारला. (Appeal of Raj Thackeray)