मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या शिक्षण धोरणांवर सडकून टीका केली आहे. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, यांच्यापासून मनमोहन सिग यांच्यापर्यंत देशात तंत्रज्ञान आले. आयआयटी, आयआयएम अशा संस्थांची स्थापना केली. पण भाजपच्या काळात फक्त गोशाळा बांधल्या, तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगता, तुम्ही शेण गोळा करायला सांगता, गोमुत्र गोळा करायला सांगता, अशी सडकून टीका राऊत यांनी केली. (Raut criticizes following the minister’s resignation)
मोदी सरकारने आधुनिक शिक्षणाचे वाटोळे केले
नरसिंहराव यांनी मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री नेमले होते याकडे लक्ष वेधत राऊत यांनी इकडे संघाचे शिक्षणमंत्री करण्याऐवजी निलकेणी यांना शिक्षणमंत्री करा अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनाही शिक्षण मंत्री करा असेही राऊत म्हणाले, पंडीत नेहरुंनी आधुनिक शिक्षणपद्धती आणली. मात्र गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने आधुनिक शिक्षण पद्धतीचे वाटोळे केले. त्यांनी पुराण आणि महाभारत काळातील शिक्षण पद्धती आणली त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
प्रल्हाद जोशी यांचा शिक्षणाशी काय संबध?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्याचा प्रदभार मिळालेल्या प्रल्हाद जोशी यांचा शिक्षणाशी काय संबध आहे? असा सवाल करत परदेशात शिक्षण घेणाऱ्या मंत्र्यांची मुले विदेशात शिकत आहेत त्यांची नावे जाहीर करा अशी मागणीही केली. (Raut criticizes following the minister’s resignation)
आरएसएसने सर्व विद्यापीठाचे कुलगुरू नेमले
देशाच्या शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हस्तक्षेपाबद्दलही टीका करत राऊत यांनी देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारने नव्हे तर आरएसएसने नेमले आहेत. अशा कुलगुरुंमुळे शिक्षणांचा दर्जा कसा उंचावणार? असा सवालही केला. सर्व मंत्र्यांची, नेत्यांची मुले परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत आणि गरिबांच्या मुलांना मात्र बोगस शिक्षण पद्धतीत अडकवून ठेवले जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कायदा केवळ देखावा आहे
पेपरफुटीवर नवीन विधेयकांवरही खासदार राऊत यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, पेपर फोडणाऱ्यांना आधी एक वर्षाची शिक्षा आणि एक कोटी रुपये दंड होता. आता फक्त आकडे बदलून १० वर्षाची शिक्षा आणि दहा कोटी रुपये दंड करण्यात आला आहे. हे सरकार स्वत: कायद्याचे किती पालन करते असा सवाल करत देशात पक्षांतर बंदी कायदा असताना मोदी, शाह, एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते आणि लोकसभा, विधानसभा, राज्यसभेचे अध्यक्ष या कायद्याचे खरोखर पालन करतात का? कायदा हा केवळ एक देखावा बनला आहे, अशी टीका केली आहे. (Raut criticizes following the minister’s resignation)