फरार असलेला मंत्रीपुत्र विकास गोगावले पोलिसांना शरण

Vikas Gogawale surrendered to the police

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याची मुंबई उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढल्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले आज शुक्रवारी सकाळी महाड पोलिसांना शरण आला. उच्च न्यायालयाने सकाळी ११ वाजेपर्यंत शरण येण्याची मुदत दिली होती.

नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या राडा प्रकरणी विकास गोगावले याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. गेले महिनाभर तो फरार होता. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात माधव जामदार यांच्या खंडपीठात सुनावली झाली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. पोलिस रेकॉर्डवर फरास असलेला महेश गोगावले याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती प्रतिवादी वकिलांनी न्यायालयाला दिली. (Vikas Gogawale surrendered to the police)

त्यानंतर न्यायालयाने राज्यसरकारला चांगलेच सुनावले. मंत्र्यांची मुलं गुन्हा करुन मोकाट फिरतात. मंत्र्यालयाच्या संपर्कात असतात. पण पोलिसांना सापडत नाही. हे सगळं होऊनही मंत्री खुशाल मंत्रीमंडळात बसतात. सरकारने मनात आणले तर २४ तासात अटक होऊ शकते. विकास गोगावले महिनाभर फरार असूनही त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नाही. या राज्यात कायदा सुरव्यवस्था आहे की नाही? असा सवाल न्यायमूर्ती जामदार यांनी केला. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत विकास गोगावले पोलिसांत हजर झाला नाही तर मला ऑर्डर द्यावी लागेल असेही स्पष्ट केले होते. (Vikas Gogawale surrendered to the police)

त्यानंतर पोलिसांनी वेगवान हालचाली केल्या. आज सकाळी विकास गोगावले पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर