भारत संचार निगम चे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कांबळे यांचे निधन

Prashant Kamble has passed away

कोल्हापूर : भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या आस्थापनेत, कोल्हापूर विभागात,डेप्युटी जनरल मॅनेजर (वित्त) म्हणून कार्यरत असलेले प्रशांत ग. कांबळे यांचे १७ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगाने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा व मुलगा निरज आहे. (Prashant Kamble has passed away)

दिवंगत प्रशांत कांबळे यांनी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय महाविद्यालय येथे मरणोत्तर नेत्रदान व देहदान केले आहे. ते काही वर्षे रत्नागिरी, गोवा, अंदमान येथील बी.एस.एन.एल.च्या कार्यालयात कार्यरत होते. एक स्वच्छ, सचोटीने कार्य करणारे व मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी म्हणून ते कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. (Prashant Kamble has passed away)

 प्रशांत कांबळे यांची आदरांजली सभा रविवारी २५जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे मूळ गाव (पुनस,या.लांजा. जिल्हा रत्नागिरी) येथे होणार आहे, असे त्यांचे जेष्ठ बंधू महेंद्र कांबळे यांनी कळविले आहे. (Prashant Kamble has passed away)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर