बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव जवळील राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयातील अठ्ठावीस काळविटांचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. बेळगाव पासून काही अंतरावर पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी गावात हे प्राणी संग्रहालाय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले आहेत. (Twenty blackbucks die)
शनिवारी प्राणी संग्रहालयातील अचानक वीस काळविटांचा मृत्यू झाल्यामुळे वन खात्यात देखील खळबळ माजली आहे. नोव्हेंबर तेरा तारखेला आठ काळविटांचा मृत्यू झाला होता.केवळ तीन दिवसांच्या कालावधीत अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाला आहे. बॅक्ट्येरिया इन्फेक्शन मुळे मृत्यू झाल्याची शंका वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे. (Twenty blackbucks die)
असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फ़ॉरेस्ट नागराज यांनी प्राणी संग्रहलयाला भेट देऊन माहिती घेतली. दोन दिवसापूर्वी मृत झालेल्या काळविटांचे मृतदेह तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. आता शनिवारी मृत झालेल्या काळविटांच्या मृतदेहांची तपासणी करण्यात येणार आहे.म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथून पशु वैद्यकीय तज्ज्ञ काळविटांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी येत आहेत. (Twenty blackbucks die)