Congress on its own in Mumbai : मुंबईत  काँग्रेस स्वबळावर लढणार 

Congress on its own in Mumbai

जमीर काझी : मुंबई  : मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळाचा नाराचा दिला आहे. महानगरपालिकेच्या २२७ जागा लढवण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली. मुंबई मालाड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एक दिवसीय शिबिरात त्यांनी घोषणा केली. (Congress on its own in Mumbai)

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहे,   या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून लोकसभा निवडणुकीसारखा विजय मिळवा, असे आवाहन चेन्नीथला यांनी केले. 

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आपल्यासमोर मोठे आव्हान असले तरी डगमगून जाता कामा नये. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पराभवाने खचून जात नाही, आता रडायचे नाही तर लढायचे आहे हे लक्षात ठेवा, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकच लक्ष्य ठेवा आणि विजय मिळवण्यासाठी काम करा, असे आवाहन करताना त्यांनी भाजपा व आरएसएसवर तुफान हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्म सोडायला लावणारे हेच मनुवादी विचाराचे लोक होते, असेही त्यांनी सांगितले. (Congress on its own in Mumbai)

मुंबई महानगरपालिकेत कोट्यवधी लुटले गेले: खा.गायकवाड

खासदार  वर्षा गायकवाड  म्हणाल्या की, तीन वर्षापासून बीएमसीमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, या काळात महानगरपालिकेत भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. कोट्यवधी रुपये लुटले आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी खर्च केल्या आहेत. मुंबईतील महत्वाच्या जागा काही खास लोकांना कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत. काँग्रेस  मुंबईकरांचा आवाज बनून मुंबईतील पाणी, वाहतूक समस्या, भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण यावर आवाज उठवत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत समविचारी छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा आमचा विचार असून मुंबईतील सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे. (Congress on its own in Mumbai)

कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे

निवडणुका दोन महिन्यावर आल्या तरी निवडणूक आयागाने अद्याप पुरवणी मतदार यादी दिलेली नाही. मतदान आठ दिवस असताना मतदार यादी येते मग यावर काम कधी करायचे? असा सवाल खासदार गायकवाड यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, या याद्यांमध्ये घोळ केला जातो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. मतदार याद्या तपासा, बुथ लेवलवर जाऊन काम करा आणि पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आण्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिराला आरपीआयचे राजेंद्र गवईही या शिबिराला उपस्थित होते. तर शिबिराच्या दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, निरंजन टकले, अशोक वानखेडे, राम पुनियानी  मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले. (Congress on its own in Mumbai)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर