Jadeja Yadav’s spin is impressive : भारत, दक्षिण आफ्रिका कसोटीत दुसऱ्या दिवशी १६ बळी

Jadeja Yadav's spin is impressive

कोलकोता : ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून १६ बळी गेले. भारताचा डाव १८९ धावांवर संपल्यावर भारताने नाममात्र आघाडी घेतली. पण पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची दिवसअखेर ७ बाद ९३ अशी धावसंख्या झाली. दक्षिण आफ्रिका फक्त ६३ धावांनी आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकन मार्को जॅन्सन आणि सायमन हार्मर या जोडीने मिळून सात गडी केले. दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीने आफ्रिकन फलंदाजांना नाचवताना जडेजा यादव जोडीने सहा बळी मिळवले. त्यामध्ये जडेजाने चार गडी बाद केले. या सामन्यावर भारत पकड मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. (Jadeja Yadav’s spin is impressive)

आज दुसऱ्या दिवशी भारताने सुरुवात केली. पण दक्षिण आफ्रिकेने भारताला १८९ धावात गुंडाळले. सलामीवीर के.एल. राहूलने सर्वाधीक ३९ धावा केल्या. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने पत्येकी २७ धावा केल्या. मार्को जॅन्सन आणि सायमन हार्मर यांनी खेळपट्टीचा फायदा घेत सात गडी बाद केले. जॅन्सने ३५ धावात ३ तर हार्मरने ३० धावांत चार गडी बाद केले. भारताने पहिल्या डावात ३० धावांची नाममात्र आघाडी घेतली. शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाल्याने तो चार धावावर निवृत्त झाला. ध्रुव जुरेल आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १४ धावा केल्या. केशव महाराज आणि कॉर्बिन बॉशने प्रत्येकी एक गडी बाद केला. (Jadeja Yadav’s spin is impressive)

दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळत झाली. सलामीवर रियान रिकल्टनला कुलदीप यादवने पायचित पकडले. त्याने ११ दावा केल्या. त्यानंतर जडेजाने मार्करमला ध्रुव जुरेलकडे झेल द्यायला भाग पाडले. भारतीय फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू लागोपाठ बाद झाले. दुसरीकडे कर्णधार टेम्बा बुवुमा २३ धावांवर खेळत आहे.  दिवसअखेरीस खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने ७ बाद ९३ धावा केल्या. अजून सामन्याचे तीन दिवस बाकी असले तरी रविवारीच सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. (Jadeja Yadav’s spin is impressive)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर