Sule : सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत ‘कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया : भाग २’ पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन

Sule

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ आणि कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया : भाग २’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ वा. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. (Sule)

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा होणार आहे. यावेळी प्र कुलगुरु प्रा. पी.एस.पाटील, सरोज पाटील,  विजया पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांचे स्त्री सक्षमीकरण : आव्हाने आणि संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पवार यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य बाई चळवळीतील जयबाई हाविरे, भागिरथी ताबंट यांचे लेख डॉ. छाया पोवार यांनी लिहिले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील माईसाहेब बावडेकर, रत्नमाला घाळी, रजनीताई मगदूम, प्रा. डॉ. माया पंडित यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल लेख आहेत.

कोल्हापूरच्या राजकारणातही महिलांनी ठसा उमटवला आहे. त्यामध्ये माजी आमदार सरोजिनीताई खंजिरे, माजी खासदार निवेदिता माने, माजी नगरसेविका भारती पोवार, माजी महापौर हसिना फरास यांच्या कार्य कर्तुत्वाबद्दल लेख लिहिले आहेत.

वारणा उद्योग समुहाच्या शोभाताई कोरे, साखर उद्योगातील विजयमाला देसाई, स्वयंसिद्धाच्या कांचनताई परुळेकर, रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गर्व्हनर उषा थोरात, उद्योजिका साधना घाटगे, अश्विनी दानिगोंड यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. (Sule)

समाजकारणा आणि राजकारणातील सुप्रियाताई पाटील, माई ऐतवडेकर, उर्मिलाकाकी सबनिस, सुशिलाताई कुलकर्णी, इंदूताई सावंत, सुमन पाटील तर समाजकारणातील शकुंतला पाटील, आशा अपराद, पार्वतीबाई माळी, सुचेता कोरगांवकर, साधना झाडबुके, रुपा शहा, नसिमा हुरजुक, अनुराधा सामंत, अनुराधा भोसले, सुशिला यादव, मालूबाई काळे, शांताबाई यादव या कर्तुत्वाचा आढावा घेण्यात आला आहे.  (Sule)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर