कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला. इलेक्टिव्ह मेरीट असणारे उमेदवार निवडण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील प्रमुख कारभारी मंडळींची एक समिती नियुक्ती केली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांची उपस्थिती होती. (Sub-committee for selection of competent candidates)
बैठकीत तिन्ही पक्षांच्या कारभाऱ्यांची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या वतीने युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपच्या वतीने आमदार अमल महाडिक, प्रा.जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदील फरास, महेश सांवत, संदीप कवाळे प्रमुख कारभारी असणार आहेत. या उपसमितीची उद्या शनिवारी बैठक पार पडणार आहे. (Sub-committee for selection of competent candidates)
कारभाऱ्यांची उपसमिती प्रत्येक प्रभागातील महायुतीच्या इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करणार आहे. त्यानुसार किती जागांवर कोण लढणार याची प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार उपसमिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक या वरिष्ठ नेत्यांच्या समितीकडे अहवाल सादर करणार आहे. यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम जागा वाटपावर निर्णय घेणार आहे. एकूणच महायुतीच्या जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून, या बैठकीत महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी एकसंघ राहण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. (Sub-committee for selection of competent candidates)