निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या बावडेकरांनी २० वर्षात काय केले?

Kshirsagar an attack on Satej Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी : थेट पाइपलाइनमध्ये ७५ कोटींचा ढपला पाडणारे निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणारे बावड्यात बसले आहेत. निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांनी गेल्या वीस वर्षात शहरात कोणती विकास कामे केली आहेत, असा सवाल करत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता केला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्यात ते बोलत होते.

विरोधकांकडून बदनामीचे षढयंत्र

सत्तेत नसताना कोल्हापूर शहरासाठी मोठा निधी आणला असताना विरोधकांकडून बदनामीचे षढयंत्र रचले जात आहे. या षढयंत्राचा मी कायम मुकाबला करत आहे, असे सांगून आमदार क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. १०० कोटी रस्त्यांमध्ये घोटाळा झाला म्हणून निगेटिव्ह नॅरटिव्ह सेट करण्याऱ्यांनी थेट पाइपलाइनमध्ये ७५ कोटींचा ढपला पाडला आहे, असा आरोप त्यांच्याच सहकाऱ्यांनी केला आहे. १०० कोटी निधीतून शहरात १६ रस्ते केले जात असून त्यामध्ये १२ रस्ते पूर्ण झाले आहेत. रस्त्यांची ८० टक्के कामे पूर्ण झाली असून चार रस्त्यांचे काम अद्याप बाकी आहे. पण खोटं बोलून निगटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणारे बावड्यात बसले आहेत. त्यांनी २० वर्षात काय केले असा सवाल क्षीरसागर यांनी केला. (Kshirsagar an attack on Satej Patil)

महायुतीच्या काळात विकास कामे मंजूर

महायुतीच्या काळात खंडपीठ मंजूर झाले आहे. रंकाळा सुशोभिकरणामुळे पर्यटक धन्यवाद देत आहेत. आता रंकाळयाच्या मध्यभागी कारंजा बसणार आहे. सेल्फी पाईंट करणार आहोत. राजाराम तलाव परिसरात कन्वेक्शन हॉलची उभारणी होणार आहे. शंभर कोटींच्या रस्त्यांचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. आयटीपार्कसाठी जागा मंजुर झाली आहे. शहराची हद्दवाढ होणार आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आगामी महानगरपालिकेत विरोधकांना मतदार उत्तर देतील, असा इशारा दिला आहे. (Kshirsagar an attack on Satej Patil)

निष्ठावंत शिवसैनिकांना विविध समितीवर संधी

पक्षात शिस्त आणि निष्ठा महत्वाच्या असतात असे सांगून आगामी महानगरपालिकेत उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचा आदेश पाळत शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले. सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर मंत्रीपदासाठी माझे नाव असताना मंत्रीपद मिळाले नाही. पण पक्षाचा आदेश पाळून मी काम करत आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्या निष्ठावंत शिवसैनिकांना महानगरपालिकेच्या विविध समितीवर संधी दिली जाईल, असे आश्वस्तही त्यांनी केले. (Kshirsagar an attack on Satej Patil)

यावेळी जिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण, माजी आमदार जयश्री जाधव, शहराध्यक्ष शिवाजीराव जाधव, सत्यजीत कदम, किशोर घाटगे, पवित्रा रांगणेकर, विनायक साळोखे, हर्षल सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, राहूल चव्हाण, रत्नदीप शिरोडकर, सुनील जाधव, मंगला साळोखे, दुर्गेश लिंग्रस, अजित इंगवले आदी उपस्थित होते. सुत्र संचालन अंकुश निपाणीकर यांनी केले.  

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर