मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा खात्मा करणार : उद्धव ठाकरे

Shiv Sena and MNS alliance announced

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. मुंबई आणि महाराष्ट्रावरती कोणीही वाकड्या नजरेने पाहणाऱ्या, कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही अशी इशारा देत आम्ही शपथ घेऊन मैदानात उतरलो आहे. अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.  मुंबईचा महापौर मराठी होणारच असून तो आमचाच होणार असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. राजकीय पक्षांची मुलं पळवणाऱ्या दोन टोळ्यामुळे जागा वाटप जाहीर करणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबईचे लचके तोडण्याचे, चिंधड्या करण्याचे प्रयत्न

वरळीतील हॉटेल ब्लू सी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संवाद साधला. तत्पुर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन केले.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शिवसेना अग्रेसर होती. १०७ लोकांनी बलिदान केल्याने मुंबई महाराष्ट्राला मिळाली. पण काहींना मुंबईचे लचके तोडायची, चिंधड्या उडवायच्या आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांना मुंबई मिळाली नाही त्यांचे प्रतिनिधी केंद्रात बसले आहेत. त्याविरोधात आम्ही कर्तव्य म्हणून मी आणि राज एकत्र आलो असून यापुढे एकत्र राहणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (Shiv Sena and MNS alliance announced)

चुकाल तर संपाल

विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा झाली होती. पण आता मराठी माणसाने चुकाल तर संपाल अशी वेळ आली आहे. उतू नका, मातू नका, मराठी वसा टाकू नका असे आवाहनही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले. (Shiv Sena and MNS alliance announced)

राजकारणाऱ्यांची मुलं चोरणाऱ्या दोन टोळ्या

इतर कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे या माझ्या वक्तव्याने एकत्र येण्याची सुरुवात झाली असे आठवण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची घोषणा केली. सध्या महाराष्ट्रात मुलं चोरणाऱ्या खूप टोळ्या फिरत आहेत. मुंबईचा महापौर मराठी होणारच असून तो आमचाच होणार असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. सध्या महाराष्ट्रात फार मुलं फिरणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. राजकीय पक्षांची मुलं पळवणाऱ्या दोन टोळ्या आहेत असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. आजच्या पत्रकार परिषदेत जागा वाटप जाहीर करणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले., जे निवडणुका लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे वगैरे माहिती नंतर दिली जाईल. मुख्यमंत्र्यांचेही काही व्हिडिओ फिरत आहे असे सांगून माझ्याकडेही व्हिडिओ खूप व्हिडिओ आहेत. पण ते काय बोलणार त्यानंतर माझे व्हिडिओ लावणार असे राज ठाकरे यांनी सांगितले. (Shiv Sena and MNS alliance announced)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर