मुंबईत शरद पवार गट ठाकरे बंधूसोबत?

Sharad Pawar group with the Thackeray brothers

मुंबई : प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुक ठाकरे बंधूंनी एकत्र  आल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप अनिश्चित असताना त्यांच्या प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुंबईत त्यांनी २५ जागांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आले.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी ठाकरेंची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

महापालिका निवडणुकीसाठी जिथे जिथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नाही,  तिथे -तिथे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याच्या तयारीत आहे, याच पार्श्वभूमीवर  दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनिकरणाची देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू असून गुरुवारी  रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची बैठक झाली, तर आज अंकुश काकडे आणि बापूसाहेब पठारे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. (Sharad Pawar group with the Thackeray brothers)

 जयंत पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी थेट मातोश्रीवर जाऊन जवळपास दोन तास चर्चा झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेसाठी २५  जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आहे. 

दरम्यान या भेटीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आमची चर्चा सुरू आहे, मी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीच्या चर्चेसाठीच आलो होतो. आमची चर्चा झाली मात्र आम्ही अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाहीत.  आम्ही महाविकास आघाडीमधील घटक आहोत, म्हणून मुंबईमध्ये शिवसेनेसोबत आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी म्हणून लढवावी, असे आम्हाला वाटत होते. परंतु आमची तेवढी ताकद मुंबईमध्ये नाहीये, मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे आमची जागा वाटपासंदर्भात शिवसेना ठाकरे गटासोबत चर्चा सुरू आहे. चर्चा सकारात्मक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. (Sharad Pawar group with the Thackeray brothers)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर