सोलापुरात भाजपच्या दोन आमदारांची खदखद; निष्ठावंत पॅटर्नची तयारी

The loyalist pattern in Solapur

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजपमध्ये अन्य पक्षातील नेत्यांच्या इनकमिंगमुळे भाजपच्या दोन आमदारांनी खदखद व्यक्त केली आहे. दोन्ही आमदारांकडून निष्ठावंत पॅटर्न सुरू केल्याचे पहायला मिळत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये प्रवेश झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील भाजपा आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख ‘निष्ठावंत पॅटर्न’ सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुभाष देशमुख म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. तसेच या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्यांची किती क्षमता आहे, याबाबत मुलाखतीतून प्रश्न विचारणा होत आहे. मात्र भाजपामध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही, अशी माहिती देशमुख यांनी दिली. (The loyalist pattern in Solapur)

विजयकुमार देशमुख म्हणाले की, आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कुठल्याही पक्षातून उभे राहू दे, आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार आहोत, अशी भूमिका मांडली. आमदार सुभाष देशमुख यांनी देखील हीच भूमिका मांडली आहे. तसेच निवडणूक समितीत कोण-कोण आहेत? याबाबत मला माहिती नाही. त्यामुळे जागांच्या वाटघाटी हे केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करत आहेत. कोणाशी चर्चा करायच्या हे माहिती नसल्याने मी कुठेही चर्चेला गेलो नाही, असे मत विजयकुमार देशमुख यांनी मांडले. मात्र दोन्ही नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्ते ज्या पक्षात जातील, त्यांचा प्रचार आम्ही करू, असे त्यांनी स्पष्ट केले. (The loyalist pattern in Solapur)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग