Rohit Pawar criticizes CM: देवरांकडून गृहविभागाचे वस्त्रहरण : आ. रोहीत पवार

Rohit Pawar criticizes CM

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलींद देवरा यांच्याकडून राज्याच्या गृहविभागाचे वस्त्रहरण सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आ. रोहीत पवार यांनी केली आहे. (Rohit Pawar criticizes CM)

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावरून शिवसेनेचे (शिंदे) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित “यापुढे आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी बंदी घालावी”, अशी विनंती केली आहे.

देवरा यांच्या पत्राचा उल्लेख करत शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. (Rohit Pawar criticizes CM)

“मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गृह विभागाचे राजकीयदृष्ट्या कपडे काढतायत (वस्त्रहरण करताहेत) ”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Rohit Pawar criticizes CM)

पवार म्हणाले, “खासदार देवरा यांनी हे पत्र मुख्यमत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. गृह विभाग झोपला होता का? असा प्रश्न या पत्राच्या माध्यमातून विचारला आहे. आंदोलनाला किती लोक येणार होते? तुमच्याकडे ही माहिती नव्हती का? तसेच अशी माहिती गृह विभागाकडे असली तरी ती लपवण्यात आली, बृहन्मुंबई महापालिकेला दिली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून गृह विभागाचे राजकीयदृष्ट्या कपडे काढत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे.”

दरम्यान, “दक्षिण मुंबईचा सातबारा या धनिकांच्या नावावर केलेला नाही”, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर