Yuki Bhambri : युएस ओपन दुहेरीत युकी भांब्री उपांत्य फेरीत

Yuki Bhambri

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीने इतिहास घडवला आहे. युएस ओपन दुहेरीमध्ये त्याने न्यूझिलंडच्या मायकेल व्हिसनसह पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. (Yuki Bhambri)

उपांत्यपूर्व फेरीत युकी आणि व्हिनस या जोडीने ११ व्या मानांकित निकोला मेकटिक आणि राजीव राम यांचा ६-३. ६-७,  ६-४ असा पराभव केला. यापूर्वी त्यांनी चौथ्या मानांकित केव्हिक क्रॅविट्झ आणि टिम पुएट्झ जोडीचा ६-४, ६- ४ असा पराभव केला. युकीने दुखापतीमुळे टेनिस एकेरीचा खेळ बंद करुन दुहेरीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

युकीने यापूर्वी ज्युनिअर गटात ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धात जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. भांब्रीने लिएंडर पेस, महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांच्यानंतर पुरुष दुहेरीत भारताचा ठसा उमटवला आहे. दुहेरीत त्याने फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला होता.  आता भांब्री आणि व्हिनस यांचा सामना सहाव्या मानांकित ब्रिटनच्या जो सॅलिसबरी आणि नील स्कुप्सकी यांच्याशी होईल.

या विजयानंतर युकी भांब्री म्हणाला, हा सामना कठीण होता. डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. प्रतिस्पर्धी हे ग्रॅड स्लॅम विजेते खेळाडू आहेत. त्यांच्या अनुभवामुळे आमच्यासाठी हा सामना आणखी अवघड झाला. (Yuki Bhambri)

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार