विनाशकारी वाढवण बंदर रद्द होईपर्यंत लढा  चालू राहणार  : हर्षवर्धन सपकाळ

Public Protest March Against the Vadhavan Port

जमीर काझी : मुंबई :  पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. हा प्रकल्प स्थानिक लोक, शेतकरी, आणि मच्छिमार यांच्या मुळावर उठलेला आहे. दिल्लीतील रंगा बिल्ला यांना पालघरचा विकास करायचा नाही तर अदानीचा विकास करायचा आहे, त्यासाठी हा प्रकल्प आणला आहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला व स्थानिकांचे संसार उद्ध्वस्थ करणारा विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्प रद्द झाल्याशिवाय स्थानिकांनी  सुरु केलेला हा लढा थांबणार नाही, असे प्रतिपादन  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.  (Public Protest March Against the Vadhavan Port)

 पालघर जिल्ह्यातील वरोर वाढवण येथील उलगुलान वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार कपिल पाटील, दीपक पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, मनिष गणोरे, धनंजय शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी व हजारो लोक उपस्थित होते. (Public Protest March Against the Vadhavan Port)

 हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देशात सुरु असलेल्या विविध आंदोलनाला एक व्यासपीठ देण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असून या त्यांच्या मोहिमेत ३६ हजार आंदोलनांची नोंद झाली आहे, त्यातील ३.५ हजार आंदोलने महाराष्ट्रात सुरु आहेत. शिक्षण, आरोग्य, जमिनी, पर्यावरण यासारख्या विषयावर ही आंदोलने होत आहेत, आंदोलने वेगवेळी असली तरी त्यांचा शत्रू मात्र एकच आहे. वाढवणचा लढा जिंकला तर सर्व आंदोलनाचा विजय असेल पण दिल्लीतील ५६ इंचाचा छोटा बंदर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे बंदरही जाणार नाही. महाराष्ट्र व वाढवण वाचवण्यासाठी हा लढा सुरु आहे. तोडा, फोडा व राज्य करा या ब्रिटीशांच्या नितीप्रमाणे भाजपा सरकारही या आंदोलनात फुट पाडत आहे पण एकजूट रहा असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. (Public Protest March Against the Vadhavan Port)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक