नागपुरात शेतकरी प्रश्नांवर विरोधकांचे आंदोलन 

Opposition protests in Nagpur

नागपूर : प्रतिनिधी : राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहे, मात्र महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा करते पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी विरोधी धोरणे सरकारची राहिली आहे अशी टीका करीत महाविकास आघाडीने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. (Opposition protests in Nagpur)

सरकार विरोधी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडले. महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले पण अजूनही कर्जमाफी केलेली नाही. कापसाला हमीभाव मिळत नाही, कापसावरील आयात कर शून्य केला आहे त्यामुळे परदेशातील कापूस भारतात आला आहे

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.तसेच धानाला देखील बोनस मिळत नाही, असा आरोप करण्यात आला.  आंदोलनात आमदार विजय वडेट्टीवर, अदित्य ठाकरे, सतेज पाटील, भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार सहभागी झाले होते. (Opposition protests in Nagpur)

Related posts

मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी

भर उन्हात शेताच्या बांधावर मनोज जरांगेचे आमरण उपोषण सुरू

भाजपच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त