गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना धुळ चारली

Satej Patil emerges victorious in Gokul Milk Union

कोल्हापूर : प्रतिनिधी : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्र्यासह दोन दिग्गज मंत्री, दोन खासदार, दहा आमदारांची तगडी फौज असतानाही विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी विरोधकांना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत धुळ चारली. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफांना गोकुळच्या मतदारांनी घरी बसवले. अतिशय अटीतटीच्या लढतीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने अतिशय अटीतटीच्या लढतीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना महायुतीचा  १३-१२ अशा फरकाने जिंकून एक नवा इतिहास रचला. (Satej Patil emerges victorious in Gokul Milk Union)

अवसायानातील दूध संस्थांनी मतदार म्हणून नोंदणी रद्द करण्याची न्यायालयीन प्रक्रिया, भाजप की राष्ट्रवादी मोठा भाऊ, जागा वाटप यामुळे महायुतीचे सूर निवडणूकीत शेवटपर्यंत जुळले नाहीत. त्याच्या उलट सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, डाव्या संघटनांना एकत्र घेत समविचारी आघाडीच्या पॅनेलचा जोरदार प्रचार केला. महायुतीची सत्ता आल्यानंतर गोकुळ मुंबई आणि गुजरातच्या दावणीला बांधणार हा सतेज पाटील यांचा प्रचार मतदारांचा चांगलाच भावला. महायुतीकडे ४२०० हून अधिक ठराव असतानाही मतदारांनी पॅनेल टू पॅनेल मतदान न करता क्रॉस वोटिंग मोठ्या संख्येने झाल्याने समविचार आघाडीने विजय संपादन केला. कामगार मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विजय कोरे, भाजपचे आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, भाजपचे आमदार राहूल आवाडे, जनसुराज्यचे अशोक माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अशी तगडी टीम असतानाही सतेज पाटील गोकुळची सत्ता खेचून आणली. (Satej Patil emerges victorious in Gokul Milk Union)

हसन मुश्रीफांना पराभवाचा धक्का

महायुतीच्या नेतृत्वाची धुरा मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे दिली होती. पण त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत पॅनेलला पराभवाचा धक्का बसला. मुश्रीफ यांचे चिरंजीव माजी अध्यक्ष नाविद मुश्रीफ माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्याकडून ओबीसी गटातून पराभूत झाले.

आमदार अमल महाडिकांच्या पत्नी शौमिका पराभूत

भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी माजी संचालिका शौमिका महाडिक सव्वांशेहून अधिक  मतांनी पराभूत झाल्या. त्यांनी फेरमतदानाची मागणी केली होती. पण त्यातही त्यांचा पराभव झाला.  सतेज पाटील गटाच्या माजी संचालिका अंजना रेडेकर आणि भाग्यश्री डोंगळे विजयी झाल्या. ए.वाय.पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटीलही पराभूत झाल्या. शौमिका महाडिक यांच्या पराभवाने महाडिक गटाला मोठा धक्का बसला.

डोंगळे, आबाजींचा फुगा फुटला

गोकुळच्या राजकारणात माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आबाजी, अरुण डोंगळे यांचा मोठा दबदबा होता. पण त्यांचा दबदबा गोकुळच्या मतदारांनी मोडून काढला. दोघांचा दारुन पराभव झाला. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील गटाचे ते किंग मेकर होते. या निवडणुकीत ते महायुतीकडून लढत होते. पण मतदारांनी त्यांचा व्यवस्थित काटा काढला अशी चर्चा सुरू आहे.

विजयी उमेदवार असे, समविचारी आघाडी

शशिकांत पाटील चुयेकर, अभिजीत तायशेटे, विद्याधर गुरबे, बयाजी शेळके, किसन चौगुले, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राहूल देसाई, बाबासाहेब चौगे, शशिकांत खोत, राजू आवळे, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे.

महायुतीचे विजयी उमेदवार

अंबरिष सिंह घाटगे, चेतन नरके, अजित नरके, वीरेंद्र मंडलिक, अजित पाटील परितेकर, अमरसिंह पाटील, मदन देसाई, राजेश पाटील, रणजितसिंह पाटील, राहूल पाटील, रणजितसिंह दिलीप पाटील, युवराज पाटील.

मतमोजणींनतर ट्विस्ट

निवडणुकीच्या पहिल्या कलात महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. जसजशी तालुक्यांतील मतदानाच्या फेऱ्या संपू लागल्या तसतसे समविचारी पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आले. पहिल्या फेरीपासून समविचार आघाडीचे शशिकांत पाटील, अभिजित तायशेटे आघाडीवर होते. त्यानंतर समविचारी आघाडीतील उमेदवारांची आघाडी वाढू लागली. अरुण डोंगळे आणि विश्वास नारायण पाटील पिछाडीवर पडले. सतेज पाटील यांच्या पॅनेलने १४-११ अशा जागा जिंकून निवडणूक जिंकली असा कल आला. तर शौमिका महाडिक सात मतांनी पराभूत झाल्याची वार्ता आली. त्यात महाडिक यांनी फेरमतदानाची मागणी केली. त्यातही त्या पराभूत झाल्याने. १५-९ जागा समविचारी आघाडीवर आली. पण अंतिम मतमोजणीत सर्वसाधारण गटातून महायुतीचे अमर पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांना आघाडी मिळाली. त्यावर अभिजीत तायशेटे यांनी आक्षेप घेतला. स्वत: सतेज पाटील मतदान केंद्रात आले. त्यानंतर दोन्ही पॅनेलमध्ये एका जागेचे अंतर राहिले. सतेज पाटील यांच्या पॅनेलने १३-१२ अशा मतांनी सत्ता स्थापन केली. (Satej Patil emerges victorious in Gokul Milk Union)

Related posts

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

गोकुळमध्ये सतेज पर्व

अंबाबाईच्या जागरादिवशी  महिषासुरमर्दिनी रुपात पूजा