Opposition alleges irregularities in voter list : निकोप निवडणूकीसाठी मतदार यादीतील घोळ संपवा

Opposition alleges irregularities in voter list

मुंबई : प्रतिनिधी :  निकोप निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. निवडणूक निपक्षपाती होण्यासाठी मतदार यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत अशी मागणी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. मतदार याद्या दाखवत नाहीत हाच पहिला घोळ आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. (Opposition alleges irregularities in voter list)

जयंत पाटलांनी दाखवले मतदार यादीतील घोळ

महाविकास आघाडी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या कामाचे वाभाडे काढले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मतदार यादीतील घोळ पुराव्यासह दाखवून दिले. वडनेर, पुणे येथील मतदार याद्यातील घोळ त्यांनी दाखवले. विधानसभा निवडणूकीपूर्वी १२ ऑक्टोबरला मतदार यादीतील नावे कमी करणे आणि वाढवण्याचे प्रकार सुरू आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Opposition alleges irregularities in voter list)

निवडणूक आयाेग मतदार यादीतील घोळाला जबाबदार

काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मतदार यादीतील घोळाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केला. मतदार यादीत नावे वाढवणे आणि कमी करण्यात येत असल्याचे पुराव्यानिशी राहूल गांधी यांनी दाखविले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील मतचोरीचा मुद्दा राहूल गांधींनी निवडणूक आयोगाला दाखवला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण आमचे समाधान झालेले नाही असे त्यांनी थोरात यांनी स्पष्ट केले. (Opposition alleges irregularities in voter list)

निवडणूका सहा महिन्यांनी घेण्याची राज ठाकरेंची मागणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी २०२४ च्या निवडणूकीत एका मतदार यादीतील घोळ वाचून दाखवला. तसेच एकाच घरात शेकडो मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादीतील घोळाबाबत राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता ते एकमेकाकडे बोल दाखवत आहेत. मतदार मतदार याद्यात घोळ असल्याने दाखवल्या जात नाहीत असा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत मतदार यादीत सुधारणा होत नाहीत तो पर्यंत निवडणूका घेऊ नका. मतदार याद्यात सुधारणा झाल्यावर सहा महिन्यांनी निवडणूका घ्या अशी मागणी त्यांनी केली.

निवडणूक आयोग कठपुतली : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची तुलना कठपुतलीशी केली. निवडणूक निकोप आणि निपक्षपातीपणे झाली पाहिजे. आम्ही केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाशी बोललो. पण कठपुतलीप्रमाणे वागत आहेत. निवडणूक आयोगाने एक जुलै २०२५ ही मतदार यादीची तारीख ठरवली आहे. पण त्यानंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांवर हा अन्याय आहे. व्होट चोरी रोखल्याशिवाय निवडणूका निपक्षपातीपणाने होणार नाही. व्होट चोरीचे मार्ग आम्ही बंद करत आहेत. आमचा ईव्हीएमवर आक्षेप आहे. आम्ही मतदार याद्या मागत आहेत पण त्या देत नाहीत. निवडणूकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही देत नाहीत. निवडणूक आयोगाने आम्हाला दोन दिवसात कळवतो असे सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पावले उचलू असे ठाकरे यांनी सांगितले. (Opposition alleges irregularities in voter list)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर