Italy Israel football match : हेलिकॉप्टर, ड्रोनसह हजार पोलिसांचा फुटबॉल सामन्यासाठी बंदोबस्त

Italy Israel football match

नवी दिल्ली : हेलिकॉप्टर, ड्रोन, पाण्याच्या तोफ आणि एक हजार पोलिसांचा बंदोबस्त फुटबॉल सामन्याच्या निमित्ताने ठेवला होता. निमित्त होते इटली आणि इस्त्रालय मधील फुटबाॅलचा सामना. इस्त्रालयने हमास संघटनेला नेस्तानाबूत करण्यासाठी पॅलेस्टाईनमध्ये जो नरसंहार केला त्याच्या निषेधासाठी उडीन या शहरात पॅलेस्टिनी समर्थकाने मोठ्या संख्येने निदर्शने केली. दहा हजार निदर्शनाकांनी शहरात मोर्चा काढल्याने शहरासह मैदान परिसरात तणाव होता. मोर्चा हिंसक झाल्याने पोलिसांनी पाण्याचा फवारा आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे सामन्यावर निदर्शनाचे सावट होते.  शेवटी इटलीने इस्त्रायलवर ३-० असा विजय मिळवला. (Italy Israel football match)

उडीन शहरात २०२६ च्या विश्वचषक पात्रता फेरीतील इटली आणि इस्त्रालय यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यावर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचे पडसाद उमटले. मैदानापासून बाहेर दहा हजार पॅलेस्टाईन समार्थकांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चातील पॅलेस्टाईन समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. फुटबॉलचा सामना आणि निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक हजार पोलिस अधिकारी बंदोबस्तास होते. हेलिकॉप्टर आणि ड्रोनने नजरही ठेवली होती. (Italy Israel football match)

ब्लूनर्जी स्टेडियमपासून निदर्शने सुरू असली तरी त्याचा तणाव सर्वत्र दिसत होता. विश्वचषक स्पर्धेत पात्रता मिळवण्यासाठी इटलीसाठी महत्वाचा सामना होता. सामना पाहण्यासाठी इटली संघांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांना क्राँकीटच्या अडथळ्यातून आणि मेटल डिटेक्टरमधून जात होते.

सामना सुरू झाल्यावर पॅलेस्टाईन समर्थकानी ढोलाच्या तालावर पॅलेस्टाईन झेंडे फडकवले. इस्त्रायलला लाल कार्ड दाखवा असे बॅनर फडकावत होते. इस्त्रायल विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी होत होती पण इटलीने बहिष्कार टाकण्यास नकार दिला.

सामना पाहण्यासाठी दहा हजार प्रेक्षक होती. प्रेक्षकांची संख्या कमी होती. इटालियन चाहत्यांनी राष्ट्रगीतानंतर जल्लोष केला. इटलीच्या माटेओ रेटेगुईने दोन गोल केले. पहिला गोल पहिल्याच्या हाफच्या स्टॉपेज वेळीत पेनल्टीवर गोल केला. दुसरा गोल ७४ व्या मिनिटाला केला. सामन्याच्या शेवटी जियानलुका मॅनिसिनीने तिसरा गोल केला. या विजयाने इटलीला त्यांच्या गटात दुसरे स्थान मिळवून दिले आणि प्ले ऑफ मध्ये स्थान मिळाले. नॉर्वे इटलीपेक्षा तीन गुणांनी आघाडीवर आहे.  (Italy Israel football match)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर