जातीयवादी प्रचारांवरुन मुश्रीफ, सतेज पाटील आमनेसामने

Mushrif and Satej Patil face off over communal propaganda

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी जातीयवादी प्रचार केला असा आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. सतेज पाटील यांना बहुमत मिळाले आहे तर त्यांनी अध्यक्ष करुन दाखवावे असे आव्हानही दिले. जातीयवादी प्रचाराच्या आरोपावर ‘जेव्हा गोकुळ अध्यक्षपदासाठी नाविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकिट दिलं त्यावेळी मी जातीयवादी नव्हतो का? असा हल्लाबोल सतेज पाटील यांनी केला. (Mushrif and Satej Patil face off over communal propaganda)

काँग्रेस नेत्यांकडून जातीयवादी प्रचार

नंदुरबार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांचे नाव न घेता मुश्रीफांनी गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी, जे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणतात त्यांनी जातीयवादी प्रचार केला. माझ्या मुलाला या निवडणुकीत टार्गेट करण्यात आले,  असा आरोप त्यांनी केला. माझ्या मुलाने सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवायला हवी होती. मात्र आरक्षित जागेवरुन माझ्या मुलाला निवडणूक लढवायला सांगितले ही माझी चूक होती अशी कबुलीही मुश्रीफांनी दिली. गोकुळच्या निवडणुकीत मतांची सरासरी पाहता सतेज पाटील यांच्या पॅनेलपेक्षा आमच्या पॅनेलला जास्त मते मिळाली आहेत. विजय आमच्या बाजुने होता, मात्र १३ उमेदवार तांत्रिकदृष्ट्या निवडून आले आहेत असा दावाही त्यांनी केला. (Mushrif and Satej Patil face off over communal propaganda)

पराभवाचे खापर भाजपवर फोडले

शशिकांत पाटील चुयेकर यांना मागच्यावेळीच अध्यक्ष करणार होतो. पण काही पक्षीय अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. पण भविष्यात शशिकांत पाटील यांना अध्यक्ष बनवण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सतेज पाटील यांच्या मोठे बहुमत मिळाले असेल तर त्यांनी अध्यक्ष निवडून दाखवावा. आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही. त्यामुळे आज निवडणूक होणार नाही असे स्पष्ट केले. शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरुन भाजसोबत वाद असल्यामुळे पराभव झाला असे सांगून त्यांनी पराभवाचे खापर भाजपवर फोडले.

अध्यक्षपदासाठी नाविद मुश्रीफांचे पाकिट मी दिले होते

मुश्रीफांच्या आरोपावर सतेज पाटील म्हणाले, हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफांना अध्यक्ष करताना मी त्यांच्या नावाचं पाकिट दिले होते. तेव्हा मी जातीयवादी नव्हतो का असा सवाल केला. मुश्रीफांनी ज्यांचावर बोलायला पाहिजे, त्यांच्यावर बोलत नाहीत. ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर ते बोलत नाहीत. त्यांच्या मुलाला कुणी कुणी पाडलं हे सुद्धा त्यांना माहित असल्याचे ते म्हणाले.

सतेज पाटील म्हणाले, कागल, चंदगड, भुदरगड, हातकणंगले हे तालुके सोडून सर्व तालुक्यांमध्ये नाविद मुश्रीफ यांना कमी मते पडली. मुश्रीफ सत्तेतील नेते असल्याने मला आव्हान देऊ शकतात. मात्र त्यांनी पुढील बैठकीला उपस्थित राहिले पाहिजे. प्रशासकांना आम्ही पत्र पाठवून कारभार देण्यासाठी विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

माझा मुलगा चेअरमन होणार नव्हता

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवड सभेसाठी महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिले. त्यावर सतेज पाटील यांनी माझा मुलगा चेअरमन होणार नव्हता. मी शेतकऱ्यांसाठी म्हणत होतो गोकुळ वाचला पाहिजे. आमच्याकडे बहुमत आहे. विरोधक गैरहजर राहिले तर जनक्षोभ होईल असा इशाराही त्यानी दिला. संचालकांच्या तीन बैठकीला आला नाही तर संचालकपद आपोआप रद्द होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

समांतर सभेत गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड

 कोरमअभावी गोकुळ अध्यक्षपदाची निवड सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी समविचारी आघाडीने समांतर सभा घेत गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील यांची निवड केली. समविचारी आघाडीकडे सर्वाधीक संचालक असल्याचा दावा करत निवड करण्यात आली. या निवडीनंतर बोलताना सतेज पाटील म्हणाले,  गोकुळच्या संचालकांना लोकांनी निवडून दिले आहे त्यामुळे आजच्या बैठकीसाठी विरोधी आघाडीतील संचालकांनी यायला हवं होतं. कोरमचा मुद्दा मिटिंगला लागतो, निवड प्रक्रियेला लागत नाही. पण आज सहकारातील काळा दिवस आहे. त्यामुळे बहुमत आम्हाला असल्याने आम्ही चेअरमन निवडला. प्रशासक असताना दूध संकलन कमी झाले असून गोकुळ दूध संघ बंद पाडायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Mushrif and Satej Patil face off over communal propaganda)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक