Mushriff advice  Patil : मुश्रीफांनी दिला सतेज पाटलांना सल्ला

Mushriff advice Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ‘मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलोय’  या आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना सल्ला दिला आहे. ही पराभूत मनोवृत्ती असून सतेज पाटील यांनी लढाई केली पाहिजे, मी विजयी होणार आहे असे सांगितले पाहिजे असा सल्ला मुश्रीफांनी दिला. (Mushriff advice  Patil)

आज शनिवारी शाहू स्मारक भवन येथील विधान परिषदेतेची काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेट आलेल्या वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील यांनी ‘मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलो आहे’  असे वक्तव्य केले. (Mushriff advice  Patil)

सतेज पाटील यांच्या या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना सल्ला दिला. मुश्रीफ म्हणाले, “मी एकटा पडलेलो आहे असं म्हटलं की घोटाळा होतोय. हे सर्व जनरल निवडणुकीमध्ये बोलणे ठीक आहे. असं बोलून त्यांना सहानुभूती मिळू शकेल. मात्र गोकुळ, विधान परिषदेच्या निवडणुकीत एकटा पडलोय म्हटलं की घोटाळा होतो. बहुतेक याचा पराभव होतोय म्हणून लोक त्या नेत्याकडे जात नाहीत. गोकुळचे मतदार ठराविक आहेत. ते फार हुशार आहेत. गोकुळ आणि विधान परिषदेला मी एकटा पडलोय, असं म्हटल्यावर काही उपयोग होणार नाही. सतेज पाटलांकडून असं बोलण्याची अपेक्षा नाही. त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असं सांगितलं पाहिजे”. (Mushriff advice  Patil)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर