Chuyekar Patil :  गोकुळ अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर  

Chuyekar Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाचे नाव मुंबईतून नव्हे तर कोल्हापूरातूनच निश्चित झाले आहे. गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी आज कोल्हापूरात बैठक घेत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केले आहे. गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र विद्यमान संचालक शशिकांत पाटील यांचे नाव अध्यपदासाठी आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Chuyekar Patil)

गोकुळचे अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी आज सोमवारी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह काही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शशिकांत पाटील यांचे नाव निश्चित केले. या बैठकीत अजित नरके, बाबासाहेब चौगुले यांच्यासह अन्य संचालकांच्या नावावरही चर्चा झाले. नाव निश्चित झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासोबत नेतेमंडळींनी चर्चा केली. (Chuyekar Patil)

अध्यक्षपदाचे नाव निश्चित झाले असले तरी नेतेमंडळींनी जाहीर केलेले नाही. शुक्रवारी ३० मे रोजी होणाऱ्या संचालकमंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. गोकुळचे नेतेमंडळी अध्यक्षपदाचे नाव असलेले पाकिट ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्याकडे देणार आहे. (Chuyekar Patil)

गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचा मुलगा शशिकांत पाटील यांच्या नावाला सर्व नेतेमंडळी आणि संचालकांनी पसंती दर्शवली आहे. तरीही पुढील तीन दिवसात जर वेगळ्या घडामोडी घडल्या तर नावात बदल होऊ शकतो. पंधरा दिवसापूर्वी अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊ नये असा आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. पण डोंगळे वगळून गोकुळच्या १७ संचालकांची आणि जिल्ह्यातील नेत्यांची एकी दिसून आल्याने अखेर डोंगळेंना राजीनामा द्यावा लागला. गोकुळमध्ये पक्षीय राजकारण आणायचे नसल्याने गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा कि महाविकास आघाडीचा हा विषय आता मागे पडला आहे. (Chuyekar Patil)

Related posts

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

बाजारात दर पाडून हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?