लोकसभेत शेवटच्या दिवशी मोदी, शाहांची पाचच मिनिटे उपस्थिती

Modi and Shah present in the Lok Sabha on the final day

नवी दिल्ली : प्रतिनिधी : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्यांदाच शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह लोकसभेत उपस्थित राहिले.  वंदे मातरम राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा केली. मोदी आणि शाह फक्त पाचच मिनिटे लोकसभेत उपस्थित राहिले. तीन आठवडे दोघेही लोकसभेकडे फिरकले नव्हते. अधिवेशनात एकही दिवस हजर राहिले नाहीत अशी टीका होऊ नये म्हणून मोदी, शाह शेवटच्या दिवशी उपस्थित राहिल्याची चर्चा आहे. (Modi and Shah present in the Lok Sabha on the final day)

मोदी, शाह, लोकसभेत तीन आठवडे अनुपस्थित

 तीन आठवड्यासाठी भरवण्यात आलेल्या संसदेचे पावसाळी अधिवेशनात लोकसभेचे कामकाज एक दिवस पूर्णवेळ चालले नाही. संसदेच्या अधिवशनात विरोधकांनी सत्ताधारी भाजपा एनडीए सरकारला राम मंदिर देणगी चोरी प्रकरण, नीट पेपरफुटी प्रकरण, जंतरमंतवर विद्यार्थी आंदोलकांवर झालेला लाठीमार या प्रश्नांवर सरकारला घेरले होते. विरोधकांच्या गोंधळामुळे सत्ताधारांनी यावर उत्तर देणे टाळले होते. सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांच्या अनुपस्थितीवर विरोधकांनी सरकारला विचारणा केली होती. दोघांनी सभागृहात निवेदन करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. दोघांच्या गैरहजेरीमुळे विरोधकांनी लोकसभेचे कामकाज बंद पाडले होते. या गोंधळातही सरकारने काही विधेयके चर्चेविना मंजूर करुन घेतली. (Modi and Shah present in the Lok Sabha on the final day)

मोदी, शाह पळ काढत असल्याचा राहूल गांधींचा आरोप

अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिला यांना विरोधकांशी चर्चा करुन नीट युजी पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर आंदोलनावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. पण विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी अमित शाह यांचे लेक्चर आम्हाला ऐकायचे नाही. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर लाठीमार आणि गोळीबाराचे आदेश कुणी दिले याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली होती. मोदी, शाह पळ काढत आहेत असा आरोपही त्यांनी केला.  विरोधक चर्चेपासून पळत आहेत असा सत्ताधारांनी आरोपही केला होता. शेवटच्या दोन दिवसात एनडीए खासदारांनी राहूल गांधीना लक्ष्य करत झारखंडमधील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रश्नी राहूल गांधीवर टीका करत मोर्चाही काढला होता.

टीका होऊ नये म्हणून मोदी, शाह लोकसभेत हजर

अधिवेशनात एकही दिवस हजर राहिलो याची टीका होऊ नये म्हणून आज गुरुवारी शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह लोकसभेत हजर झाले. सभागृहाचे कामकाज ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीतांने सुरू झाले. आणि अवघ्या पाच मिनिटांच्या आत गुंडाळण्यात आले. कुठलीही चर्चा, पुढील अधिवेशनाची घोषणा असे काही न करता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे तीन आठवडे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. मोदी, शहा लोकसभेत का आले नाहीत, जंतरमंतरवर लाठीहल्ल्याचे आदेश कुणी दिले. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण या प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मिळाली नाहीत. (Modi and Shah present in the Lok Sabha on the final day)

Related posts

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा