नवी दिल्ली : स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिकाचा गॅसचा तुटवड्यामुळे देशभर भितीचे वातावरण पसरले असताना त्याचे पडसाद संसद आणि संसदेच्या बाहेर पहायला मिळाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधींनी सरकारला एलपीजी टंचाईला तोंड देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. (Modi is scared to come to Parliament)
संसदेच्या बाहेर विरोधी पक्षांनी गॅस टंचाईवर निदर्शन करताना चूल पेटवून आंदोलन केले. आंदोलनात काँग्रेस, समाजवादी, द्रमुकसह विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. त्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की घाबरू नका. पण ते स्वत:च घाबरले आहेत. एपस्टीन आणि अदानी प्रकरणामुळे ते घाबरले आहेत. तसेच ते संसदेत यायला बघत नाहीत”. ते म्हणाले भविष्यात इंधन ही एक मोठी समस्या असणार आहे. कारण आपली उर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. ही परिस्थिती परराष्ट्र धोरणामुळे उद्भवली आहे. अजुनही उर्जा संकटाला तोंड देण्यासाठी थोडा वेळ आहे. आपण तयारी केली पाहिजे. पंतप्रधान आणि सरकारने त्वरीत तयारी सुरू केली पाहिजे. नाहीतर लाखो लोकांचे मोठे नुकसान होणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Modi is scared to come to Parliament)
संसदेबाहेर विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनाचा फोटो राहूल गांधींनी एक्स वर शेअर केला आहे. यावेळी खासदारांच्या हातात फलक होते. नरेंद्र संसदेतून गायब, देशात सिलिंडर गायब असे लिहिले होते. संसदेतही पडसाद उमटले. भाजप खासदार जगदंबिका पाल अनुदानाच्या मागण्यावर बोलत असताना काही विरोधी पक्षाचे खासदार रिकामे भांडी घेऊन वेलमध्ये घुसले. त्यांनी भांडी वाजवत गोंधळ सुरूच ठेवला आणि एलपीजी संकटावर चर्चेची मागणी केली. (Modi is scared to come to Parliament)