छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला घेऊन मतदान केंद्रात मतदान केले. मुलालासोबत घेऊन त्यांनी ईव्हीएमचे बटण दाबवले. त्यांच्या कृत्याने निवडणूक गोपनीय मतदान कायद्याचा भंग पावला आहे. आमदार भुमरे यांच्यासह मतदान केंद्रांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर राज्य निवडणूक आयोग कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. (MLA Bhumre’s young son at the polling station)
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अतिशय चुरशीने मतदान सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार विलास भुमरे अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन सकाळी मतदान केंद्रात आले. त्यांच्यासमवेत त्यांचे कार्यकर्तेही होते. आमदार भुमरे आणि त्यांच्या अल्पयवीन मुलाच्या हाताला मतदान केंद्रातील महिला कर्मचाऱ्याने बोटाला शाई लावली. त्यानंतर भुमरे मुलाला घेऊन ईव्हीएम मशिनजवळ गेले. तिथे मुलाच्या उपस्थितीत ईव्हीएमचे बटण दाबले. मतदान केंद्रातील आमदार भुमरेंची बेकायदेशीर मतदान प्रक्रिया सुरू असताना केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (MLA Bhumre’s young son at the polling station)
काही मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्याच्या समर्थकांनी ईव्हीएम मशिनची पूजाही केली. एक महिला उमेदवार हळदी कुंकवाच्या पुड्या घेऊन आली होती. तिथे ईव्हीएम मशिनवर हळदी कुंकु वाहिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (MLA Bhumre’s young son at the polling station)