कोल्हापुरात कारचा भीषण अपघात; बाप लेक ठार
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरात वर्दळीच्या शाहू मिल चौकाजवळील कोटीतीर्थ रस्त्यांवर क्रेटा कारच्या धडकेत बाप लेक जागीच ठार झाले. कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. दुचाकीवर तीन जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. घटनास्थळी कार पलटी झाली होती. दीपक महादेव वंशे (वय ६५, रा. सनगर गल्ली, दिलबहार तालीमजवळ, रविवार पेठ ) आणि त्यांची मुलगी भाग्यश्री लक्ष्मण गवळी वंशे (३०, रा. कसबा बावडा) अशी ठार झाल्याची नावे आहे. (Father and doughter killed in a car accident in Kolhapur)
दीपक वंशे हे महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील निवृत्त कर्मचारी होते. तर त्यांची मुलगी भाग्यश्री ही वकील होती. सव्वा वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता.
शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. कारने शाहू मिल जवळील कोटीतीर्थ तलाव रस्त्यावर तीन दुचाकी जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती घटनास्थळी दोघे जागीच ठार झाले. तर जखमी शेजारी मोकळ्या जागी उडून पडले होते. दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. कार रस्त्यांवर पलटी पडली होती. घटनास्थळी शाहू मिल परिसरातील नागरिक आणि उद्यमनगरमधील कामगार आणि नागरिकांनी धाव घेतली. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. (Father and doughter killed in a car accident in Kolhapur)
वंशेचे नातेवाईक आणि आप्तेष्ठांनी सीपीआर चौकात मोठी गर्दी होती. नगरसेवक विनायक फाळके, शिवसेनेचे संदीप पाटील यांनी नातेवाईकांना धीर दिला. भाग्यश्री यांचा सव्वा वर्षापूर्वी गगनबावडा येथील लक्ष्मण गवळी यांच्याशी झाला होते. विवाहानंतर ते कसबा बावडा परिसरात रहात होते. पत्नीच्या निधनाचे वृत्त कळताच लक्ष्मण गवळी यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटणारा ठरला. (Father and doughter killed in a car accident in Kolhapur)